Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Helping Hand Stricken Farmers : वाढदिवसाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; हसमुख गेहलोत यांचा अनोखा उपक्रम

Helping Hand Stricken Farmers : मिरा-भाईंदरचे भाजप गटनेते हसमुख गेहलोत यांनी वाढदिवसानिमित्त बॅनर, पोस्टर आणि होर्डिंग्जवर होणारा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा उपक्रम जाहीर केला आहे. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा देताना ‘शेतकरी आपला अन्नदाता’ हा हॅशटॅग वापरावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 05, 2026 | 03:59 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • ‘शेतकरी आपला अन्नदाता’ हा हॅशटॅग वापरण्याचे आवाहन  
  • वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळला आहे  
  • “बॅनर नको, शेतकऱ्यांना मदत हवी” हा संदेश राजकीय क्षेत्रात रुजण्याची गरज
 

Helping Hand Stricken Farmers : वाढदिवस म्हटलं की राजकीय नेत्यांच्या शुभेच्छांचे बॅनर, होर्डिंग्ज, जाहिराती आणि विविध कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मात्र, या पारंपरिक पद्धतीला छेद देत मिरा-भाईंदर शहरातील भाजपचे गटनेते व प्रमुख नेते हसमुख गेहलोत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा खर्च सामाजिक कार्यासाठी वळविण्याचे आवाहन केले आहे.

Mumbai News: तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था बळकटीकरणावर गोलमेज! विद्यार्थ्यांचे आरोग्य नियोजनाचा भाग बनणे आवश्यक

‘शेतकरी आपला अन्नदाता’ हा हॅशटॅग वापरण्याचे आवाहन

गेहलोत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, “माझ्या वाढदिवसानिमित्त कुठेही बॅनर, पोस्टर किंवा होर्डिंग लावू नका. त्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला शुभेच्छा द्या.” विशेष म्हणजे या शुभेच्छांच्या पोस्टमध्ये ‘शेतकरी आपला अन्नदाता’ हा हॅशटॅग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे सोशल मीडियावर त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येणाऱ्या प्रत्येक शुभेच्छा पोस्टमागे 500 रूपये  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जमा करण्याची ग्वाही गेहलोत यांनी दिली आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छांचे रूपांतर थेट शेतकऱ्यांच्या मदतीत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.

वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळला आहे

राजकीय क्षेत्रात वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च, मोठमोठे बॅनर आणि शक्तिप्रदर्शन यावर अनेकदा टीका केली जाते. अशा परिस्थितीत गेहलोत यांनी बॅनरबाजी टाळून त्याऐवजी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य देण्याचा घेतलेला निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. “शेतकरी हा समाजाचा अन्नदाता आहे. त्याच्यावर संकट आले असताना आपल्या आनंदाच्या प्रसंगी त्याच्या मदतीसाठी काही करता आले, तर त्यापेक्षा मोठे सामाजिक कार्य दुसरे कोणते?” असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.

“बॅनर नको, शेतकऱ्यांना मदत हवी” हा संदेश राजकीय क्षेत्रात रुजण्याची गरज

गेहलोत यांच्या या उपक्रमामुळे राजकीय नेत्यांनी वाढदिवस, जयंती अथवा अन्य वैयक्तिक कार्यक्रमांवर होणारा खर्च सामाजिक उपक्रमांकडे वळविण्याचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना ‘वाढदिवसाचा उत्सव’ हा ‘शेतकरी मदतीचा उपक्रम’ बनविण्याची संकल्पना राजकीय क्षेत्रासाठी निश्चितच अनुकरणीय ठरू शकते.

मिरा-भाईंदरमध्ये सुरू झालेला हा उपक्रम केवळ एका नेत्याच्या वाढदिवसापुरता मर्यादित न राहता इतर राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनीही स्वीकारल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी मदत निधी उभा राहू शकतो. त्यामुळे “बॅनर नको, शेतकऱ्यांना मदत हवी” हा संदेश राजकीय क्षेत्रात रुजण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Crime News: मालाडमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

 

Web Title: Hasmukh gehlot farmer aid birthday initiative mira bhayandar sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Farmer Crisis
  • Mira Bhayandar Municipal corporation Election 2026
  • Mira Bhayandar News
  • Mira Bhayander municipal elections

संबंधित बातम्या

Lotus Navratri Festival: गरब्याचा पास खरेदी करा अन् शेतकऱ्यांना मदत करा! लोटस नवरात्रोत्सवाची अनोखी मोहीम
1

Lotus Navratri Festival: गरब्याचा पास खरेदी करा अन् शेतकऱ्यांना मदत करा! लोटस नवरात्रोत्सवाची अनोखी मोहीम

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित
2

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित

Farmers Are Distressed : पाण्याअभावी नाचनवेल-पिशोर परिसरातील पिके सुकली; बळीराजा चिंतातूर आणि आक्रोश
3

Farmers Are Distressed : पाण्याअभावी नाचनवेल-पिशोर परिसरातील पिके सुकली; बळीराजा चिंतातूर आणि आक्रोश

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमध्ये नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी? १० घंटागाड्या वर्षांपासून वापराविना
4

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमध्ये नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी? १० घंटागाड्या वर्षांपासून वापराविना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.