Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kunal Kamra : ‘…तरच माफी मागणार’, तोडफोडीनंतर कुणाल कामराने स्पष्टच सांगितलं

मुंबई पोलिसांकडे कुणाल कामराने या संपूर्ण वादावरुन आपली प्रतिक्रिया मांडली आहे. मला गद्दार बोलल्याचा कोणताही पश्चाताप नाही. मला कोर्टाने जर सांगितले तरच मी माफी मागेल अशी भूमिाका त्याने घेतली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 25, 2025 | 08:32 PM
'...तरच माफी मागणार', राडा, तोडफोडनंतर कुणाल कामरा थेट बोलला

'...तरच माफी मागणार', राडा, तोडफोडनंतर कुणाल कामरा थेट बोलला

Follow Us
Follow Us:

स्टँडअप कॉमेडियन कुमाल कामराच्या गाण्यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या विडंबनात्मक कवितेवर शिंदे गटाने आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला असून कामराच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.  शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री कुणाल कामराचा कार्यक्रम झालेल्या हॉटेलचीही तोडफोड केली. या सगळ्या वादानंतर कुणाल कामराने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि राज्यात प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिंदे आणि शिवसेनेचे ४० आमदार गुवाहटीला गेले होते. त्यावरून  बंडावर केलेल्या उपहासात्मक कवितेमुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हिंदी सिनेमामधील दिल तो पागल है या गाण्याच्या चालीवर कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणावर एक कविता केली ज्यामध्ये एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडापासून ते गुवाहाटी पर्यंतचा प्रवास मांडला आहे. या गाण्यामध्ये कुणाचेही नाव घेतले नाही मात्र गद्दारचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहेत.

कामराचं हे उपहासात्मक गाणं व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी अंधेरीमधील त्याचा कार्यक्रम झालेल्या द हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली. त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्यांनी कुणाल कामराने माफी मागितली नाही तर त्याला प्रसाद देण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. या संपूर्ण वादावर आता घडामोडींनंतर कुणाल कामराने प्रतिक्रिया दिली आहे.

मला गद्दार बोलल्याचा कोणताही पश्चाताप नाही. मला न्यायालयाने जर सांगितलं तरच मी माफी मागेन, असं म्हणत कुणाल कामराने आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. तसेच त्याला विरोधकांचा पाठिंबा असल्याचा आरोप त्याने फेटाळून लावला आहे, कुणाल कामराने मुंबई पोलिसांकडे या संपूर्ण वादावरून आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

कुणाल कामराने केलेल्या काव्यावरुन सत्ताधारी आक्रमक झाले असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह विरोधकांनी मात्र त्याला समर्थन दिलं आहे. कुणाल कामराने कोणाचेही नाव घेतले नाही, मग गद्दार म्हणल्यानंतर तुम्हाला का मिरच्या झोंबतात? तुम्ही गद्दार आहात का? असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उपस्थित केला आहे.

 

Web Title: I m not regret said comedian kunal kamra first reaction on parody song of dcm eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 09:47 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Kunal Kamra
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.