Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता डोमिसाईल नसेल तर लायसन्स नाहीच, 1 ऑगस्टपासून…

राज्यात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक वाढत आहे. परप्रांतातून अनेकजण महाराष्ट्रात येतात. बाईक खरेदी करतात आणि थेट वाहतुकीचा व्यवसाय सुरू करतात. हा प्रकार यापुढे सहन केला जाणार नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 08, 2026 | 08:56 AM
राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता डोमिसाईल नसेल तर लायसन्स नाहीच, 1 ऑगस्टपासून...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता डोमिसाईल नसेल तर लायसन्स नाहीच, 1 ऑगस्टपासून...

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करण्यात आले आहे. याचा अर्थ, जे मूळ महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, त्यांनाच आता बाईक-टॅक्सी चालवता येईल. याशिवाय, बाईक-टॅक्सी चालवणाऱ्यांना मराठी भाषा येणेही बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात वाढलेली अनधिकृत वाहतूक, महिलांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न आणि परप्रांतीय चालकांचा वाढता सहभाग या सर्व गंभीर बाबींची दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत राज्य सरकारची ही नवीन नियमावली आणि भूमिका स्पष्ट केली.

विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची ओळख, कागदपत्रांची पडताळणी निश्चित करण्यासाठी नियमावलीत आवश्यक बदल करण्यात येत आहेत.

वाशीतील दुर्घटनाग्रस्त ‘गीता अपार्टमेंट’ अखेर जमीनदोस्त; नमुंमपाची मोठी कारवाई, सुरक्षेसाठी वाशी-कोपरखैरणे मार्ग काही तास बंद

या अनुषंगाने, बाईकटॅक्सी तसेच प्रवासी चारचाकी चालकांसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आणि त्यानंतरच अधिकृत बॅज देण्याची व्यवस्था लागू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

रोजगाराच्या संधी वाढतील

राज्यात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक वाढत आहे. परप्रांतातून अनेकजण महाराष्ट्रात येतात. बाईक खरेदी करतात आणि थेट वाहतुकीचा व्यवसाय सुरू करतात. हा प्रकार यापुढे सहन केला जाणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे महाराष्ट्राचे डोमिसाईल प्रमाणपत्र असेल, त्यांनाच वाहतुकीचा परवाना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाने स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी वाढतील आणि शासनाच्या महसुलातही भर पडेल.

– प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, महाराष्ट्र

इथेनॉलचा निर्णय मागे पडणार

वाहन मालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पेट्रोलमध्ये २५% इथेनॉल मिसळण्याचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशभरात E20 बाबत सुरू असलेल्या चर्चेच्या आणि वाहनधारकांकडून सुरु असलेला विरोध त्याचबरोबर ऑटोमोबाईल क्षेत्राकडून सुरु असलेल्या तक्रारी येतच होत्या. विविध व्हिडीओ व्हायरल होत होते. त्यामुळे, केंद्र सरकार सध्या E25, म्हणजेच २५% इथेनॉल असलेले पेट्रोल, लागू करण्याची घाई करत नसल्याचं समोर येत आहे.

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Web Title: If no domicile certificate then no license government decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • Government Decision
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द
1

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

Maharashtra Politics: ‘… अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करणार’; प्रताप सरनाईकांचा इशारा
2

Maharashtra Politics: ‘… अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करणार’; प्रताप सरनाईकांचा इशारा

Pratap Sarnaik: आता रिक्षा-टॅक्सी चालकांची खैर नाही! मराठी बोलता आली नाही तर परवाना धोक्यात? सरनाईकांचा महत्त्वपूर्ण निर्णय
3

Pratap Sarnaik: आता रिक्षा-टॅक्सी चालकांची खैर नाही! मराठी बोलता आली नाही तर परवाना धोक्यात? सरनाईकांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi language: चालकांना मराठी ज्ञान अनिवार्य, अन्यथा…; १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांचा मराठी संवाद पाठ्यक्रमात सहभाग
4

Marathi language: चालकांना मराठी ज्ञान अनिवार्य, अन्यथा…; १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांचा मराठी संवाद पाठ्यक्रमात सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.