Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Income Tax Office Fire: सोमवार ठरला आगीचा! चर्चगेटमधील आयकर कार्यालयाला आग, विराज प्रोफाईल कंपनीत भीषण स्फोट

Income Tax Office Fire: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी आगीच्या घटनांना सामोरे जावे लागले. एकीकडे चर्चगेटमधील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली. तर दूसरीकडे विराज प्रोफाईल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीविनहानी झाली नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 17, 2026 | 04:00 PM
सोमवार ठरला आगीचा! चर्चगेटमधील आयकर कार्यालयाला आग, विराज प्रोफाईल कंपनीत भीषण स्फोट

सोमवार ठरला आगीचा! चर्चगेटमधील आयकर कार्यालयाला आग, विराज प्रोफाईल कंपनीत भीषण स्फोट

Follow Us
Follow Us:
  • सोमवार ठरला आगीचा!
  • चर्चगेटमधील आयकर कार्यालयाला आग
  • विराज प्रोफाईल कंपनीत भीषण स्फोट
Income Tax Office Fire News Marathi: मुंबईच्या चर्चगेट परिसरातील आयकर विभागाच्या कार्यालयाच्या (Income Tax Office Fire) सात मजली इमारतीत सोमवारी (17 ऑगस्ट 2026) दुपारी आग लागल्याने खळबळ उडाली. दुपारी सुमारे २.०१ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली. आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर इमारतीत पसरला.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी चार फायर इंजिनसह अन्य अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल करण्यात आली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Pune Sports: चौथ्या फेरीअखेर धुरळा! विहान, अद्विक, अर्णवचा दणदणीत विजय; तर…

वरच्या मजल्यांवर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम

बेसमेंटमध्ये आग लागल्याने इमारतीच्या वरच्या मजल्यांवर मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे काही लोक इमारतीत अडकल्याची माहिती समोर आली. वरच्या मजल्यांवर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवान धुराच्या परिस्थितीत इमारतीची पाहणी करत असून, आत कोणी अडकले आहे का, याची तपासणी केली जात आहे.

पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी

आगीची माहिती मिळताच केवळ अग्निशमन दलच नव्हे तर मुंबई पोलीस, BEST कर्मचारी, रुग्णवाहिका पथक आणि महापालिकेच्या संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात गर्दी होऊ नये आणि बचावकार्यामध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णवाहिकाही घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.

अद्याप जीवितहानीची माहिती नाही

या आगीच्या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने सुरक्षेच्या दृष्टीने बचावकार्याला प्राधान्य देण्यात येत आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग बेसमेंटमध्ये नेमकी कशामुळे लागली, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जाणार आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच घटनेचे कारण आणि नुकसानीचा अंदाज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चर्चगेटसारख्या गजबजलेल्या भागातील आयकर विभागाच्या इमारतीला आग लागल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तर दुसरीकडे महाराष्ट्राला लागून असलेल्या पालघरमधील एका कारखान्यात मोठा स्फोट झाला असून, त्यात अनेक कामगार जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली असून, बचावकार्य सध्या सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा कारखाना पालघरच्या बोईसर एमआयडीसीमध्ये आहे. ‘विराज प्रोफाइल्स’ नावाच्या कंपनीत हा स्फोट अचानक झाला. मिळालेल्या माहितीनुसार, उत्पादन कार्य नुकतेच सुरू झाले होते, तेव्हाच मोठा आवाज झाला आणि स्फोट झाला. या अपघातात काही कामगार जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. या मोठ्या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यातून धुराचे लोट उठले आणि आग लागली. या आगीत अनेक कामगार भाजले.

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेक प्रकरणी जिल्हाधिकारी आक्रमक; नगरपरिषदेला कारणे दाखवा नोटीस

Web Title: Income tax office fire mumbai churchgate office building fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Fire
  • income tax
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
1

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
2

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
3

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान
4

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.