राज्यात यंदा पाऊसच पाऊस (फोटो- istockphoto)
सुनयना सोनवणे/पुणे: यंदा मान्सूनच्या कालावधीत महाराष्ट्राने इतर वर्षांच्या तुलनेत पावसाचा वेगळा अनुभव घेतला. मान्सूनचे आगमन वेळेआधी, म्हणजे तब्बल एक महिना लवकर झाले. ७ जूनऐवजी ७ मेपासूनच तो धो-धो कोसळू लागला. त्यामुळे पावसाचा कालावधी नेहमीपेक्षा अधिक वाढल्याचे दिसून आले. जवळपास पाच महिने चाललेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेती नियोजन विस्कळीत झाले. पावसाच्या दीर्घ सत्रामुळे भात, भाजीपाला, फळबागा आणि हंगामी पिकांना मोठा फटका बसला.
यामागचे मुख्य कारण हवामान बदल आणि समुद्र तापमानातील चढ-उतार हे आहे. समुद्राचे वाढते तापमान हवेत अधिक बाष्प साठवते, परिणामी कमी वेळेत प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे यावर्षी राज्याला हवामान बदलाचा थेट फटका बसलेला स्पष्ट दिसतो. जागतिक तापमानवाढ आणि मानवनिर्मित हवामान बदल यांनी पावसाचे गणित बदलले आहे. अल-निनो आणि भारतीय महासागर द्विध्रुव (इंडियन ओशन डायपोल) यांसारख्या नैसर्गिक चक्रांमुळे पावसाचे प्रमाण बदलते, परंतु मानवी कारणांमुळे ही चक्रेही असंतुलित झाली आहेत.
Maharashtra Rain Update: पावसाला करा बाय-बाय! येत्या दोन दिवसांत…; IMD चा अलर्ट काय?
-डॉ. एस. डी. सानप, हवामान शास्त्रज्ञ, हवामान विभाग, पुणे