Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा

Mumbai News: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मढ आयलंड आणि वर्सोवा यांना थेट जोडणाऱ्या सुमारे २,३९५ कोटी रुपयांच्या केबल-स्टेड पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्रकल्पासाठी १,२३७ खारफुटीची झाडे तोडण्यास पर्यावरणीय अटींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 12, 2026 | 03:08 PM
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा

Follow Us
Follow Us:
  • २३९५ कोटींच्या मढ-वर्सोवा पुलाला मोठा दिलासा
  • १,२३७ खारफुटी झाडे तोडण्यास हायकोर्टाची सशर्त परवानगी
  • २,०६४ मीटरचा चारपदरी पूल
  • ७० ते ८० मिनिटांची बचत होणार
 

Mumbai News: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मढ आयलंड आणि वर्सोवा यांना थेट जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी केबल-स्टेड पुलाच्या उभारणीतील मोठा अडथळा दूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकल्पाच्या मार्गात येणारी १,२३७ खारफुटीची झाडे तोडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे सुमारे २,३९५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

न्यायालयाने परवानगी देताना पर्यावरणाशी संबंधित विविध प्राधिकरणांनी घालून दिलेल्या अटींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महापालिकेने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान प्रकल्पाबाबत ही परवानगी देण्यात आली.

सध्या मढ-वर्सोवा प्रवासासाठी मोठा वळसा

वर्सोवातून रस्तेमार्गे मढ येथे जाणाऱ्या वाहनचालकांना सध्या मोठा वळसा घालावा लागतो. अंधेरी, जोगेश्वरी, राम मंदिर, ओशिवरा आणि मलाडमार्गे मढ-मार्वे रोडपर्यंत पोहोचावे लागते. या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास प्रवासासाठी मोठा वेळ खर्च होतो.

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

वर्सोवा जेटी आणि मढदरम्यान सध्या फेरीबोटीचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र भरती-ओहोटीच्या स्थितीनुसार, विशेषतः कमी भरतीच्या काळात या सेवेवर मर्यादा येतात. त्यामुळे मढ आणि वर्सोवा यांना कायमस्वरूपी रस्तेमार्गे जोडण्याच्या उद्देशाने पुलाचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला.

२,०६४ मीटर लांबीचा चारपदरी पूल

प्रस्तावित प्रकल्पांतर्गत मलाड खाडीवर २,०६४ मीटर लांबीचा चारपदरी केबल-स्टेड पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल मढ आयलंड आणि वर्सोवा यांना थेट जोडेल. पुढे तो २७.४५ मीटर रुंदीच्या विकास आराखडा रस्त्याला तसेच कोस्टल रोडच्या नियोजित मार्गाला जोडला जाणार आहे.

या पुलामुळे मढ आणि वर्सोवा यांच्यातील थेट कनेक्टिव्हिटी वाढण्याबरोबरच पश्चिम उपनगरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा भार कमी होण्याची अपेक्षा आहे. एस. व्ही. रोड आणि लिंक रोडवरील वाहतूक अन्य मार्गाकडे वळवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल, अशी भूमिका न्यायालयात मांडण्यात आली.

१,२३७ खारफुटींच्या बदल्यात ३९ हजार रोपांची लागवड

प्रकल्पाला आवश्यक पर्यावरणीय मंजुरी मिळाल्याचे महापालिकेने न्यायालयाला सांगितले. प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या खारफुटींची भरपाई म्हणून उत्तर कोकण खारफुटी विभागाच्या अखत्यारितील सुमारे नऊ हेक्टर क्षेत्रात ३९ हजार खारफुटींची रोपे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या रोपांची पुढील दहा वर्षे देखभाल आणि त्यासंबंधित कामांसाठी १.४२ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे महापालिकेने न्यायालयात सांगितले.

७० ते ८० मिनिटांची होणार बचत

मढ-वर्सोवा पुलामुळे दोन्ही भागांतील प्रवासाचे अंतर सुमारे १८ ते २० किलोमीटरने कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या रस्तेमार्गे या प्रवासासाठी वाहतुकीच्या परिस्थितीनुसार जवळपास दीड तास लागू शकतो. नवीन पूल कार्यान्वित झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी काही मिनिटांवर येईल आणि सुमारे ७० ते ८० मिनिटांची बचत होईल, असा महापालिकेचा दावा आहे.

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या

या प्रकल्पामुळे मढ, मालाड आणि वर्सोवा परिसरातील नागरिकांना थेट जोडणी मिळणार आहे. त्याचबरोबर न्यू लिंक रोड, एस. व्ही. रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीचा काही भार कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Madh island versova cable stayed bridge bombay high court allows mangrove cutting travel time to reduce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • BMC
  • Bombay High Court
  • Mumbai

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा
1

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या
2

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या

Mumbai News: शतकाअखेर मुंबई जलमय होण्याचा धोका! BMC करणार किनारपट्टीचे सविस्तर नकाशांकन
3

Mumbai News: शतकाअखेर मुंबई जलमय होण्याचा धोका! BMC करणार किनारपट्टीचे सविस्तर नकाशांकन

Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का
4

Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.