Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई
पनवेल पालिकेने शहरातील बहुतेक रस्ते २० ते ३० फुटी केलेले आहेत. यामध्ये लाईन आळी, झवेरी बाजार, व्ही. के. हायस्कूल रस्ता, महात्मा फुले रोड, टिळक रोड यांचा समावेश आहे. महापालिका झाल्यानंतर सदर रस्ते अपुरे ठरत असून रस्तारुंदीकरणाची आवश्यकता भासत आहे. मात्र शहरातील बाजारपेठेत असेही काही रस्ते आहेत, जे आजही १५ ते २० फुटीसुद्धा नाहीत. कापड गल्ली, मिरची गल्ली यांचा समावेश होतो.
पनवेल शहरात बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय शहरातसुध्दा मोठी लोकवस्ती आहे. या कारणाने येथे रहदारी जास्त आहे याशिवाय वाहनांची संख्या कमी नाही. सर्वात महत्वाची विषय असा की पनवेलमध्ये बहुतांशी सोसायट्यांमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे इमारतीत राहणारे रहिवाशी आपले वाहने रस्त्यावरच पार्क करतात, याचा परिणाम शहरातील वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात होत असल्याने आयुक्त मंगेश चितळे यांनी रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. जय भारत नाक्याच्या आसपास जुनी पेठ, कापड बाजार आणि महत्त्वाची मंदिरे आहेत. जुन्या पनवेलमधील मध्यवर्ती ठिकाण असल्याने सण-उत्सव, राजकीय सभा आणि सामाजिक चळवळींचे हे नेहमीच केंद्र राहिले आहे.
‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार
पनवेल महानगरपालिकेने सदर रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात येथील घरमालकांना वाढीव एफएसआयबाबतचा प्रस्ताव दिला होता. मात्र भाडेकरूंच्या अवास्तव मागण्यांमुळे मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद निर्माण झाला होता. म्हणूनच हा प्रस्ताव प्रलंबित होता टपाल नाका येथे दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढू लागल्याने याठिकाणी रस्ता रुंदीकरण करणे महत्वाचे होते. काही महिन्यांपूर्वी या कामात अडथळा येणाऱ्या सहा गाळ्यां वरती पालिकेच्यावतीने जेसीबीच्या साहाय्याने मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली होती. तसेच येथील ८०-९० वर्षे जुनी धोकादायक एक मजली लाकडी इमारतीवर जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई करण्यात आल्याने टपाल नाका येथील वाहतूक कोडी फोडण्यास पालिका प्रशासनास यश प्राप्त झाले आहे.






