Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : ‘तो’ पुन्हा येतोय?’ राज्यात पावसाने घेतली विश्रांती; उकाडा वाढला, 21 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात मुसळधार पावसाने काही दिवसांसाठी विश्रांती घेतल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. हवामान विभागाने पुढील 4 ते 5 दिवस तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला असून पुणे, रायगड, पालघर, ठाणे आणि नाशिकसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 15, 2026 | 05:05 PM
'तो' पुन्हा येतोय?' राज्यात पावसाने घेतली विश्रांती; उकाडा वाढला, 21 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

'तो' पुन्हा येतोय?' राज्यात पावसाने घेतली विश्रांती; उकाडा वाढला, 21 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • राज्यात पावसाने घेतली विश्रांती
  • उकाडा वाढला
  • 21 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सध्या काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ झाली असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर आणि रायगड परिसरात दमट वातावरणामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. याचदरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरी कोसळू शकतात.

महाडमधील मुसळधार पावसाने पूल गेला वाहून, रस्ता बंद

दरम्यान, पुणे, रायगड, पालघर, ठाणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आणि विजांच्या कडकडाटासह हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 21 ते 22 जुलैनंतर बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना हवामान खात्याच्या सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले असून, पावसाचा जोर वाढल्यास आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

कुठे आणि कसं असेल हवामान?

बुधवारी पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. घाट परिसरातील काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात दिवसभर हलक्या पावसाची शक्यता असून, १७ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात तुलनेने जोरदार पाऊस पडू शकतो. अहमदनगर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

१५ आणि १६ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. परभणी, बीड, लातूर, धाराशिव आणि हिंगोली येथे हलक्या पावसाची शक्यता आहे, तर नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.

भारतीय हवामान विभाग (IMD) काय म्हणतो?

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) बुधवारी पहाटे जाहीर केलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला होता, ज्यामुळे विशेषतः मुंबई महानगर प्रदेशात आर्द्रता आणि उष्णता वाढली होती. मात्र, आता कोकण प्रदेशात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० जुलैनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबईकर आणि पुणेकरांना मान्सूनची करावी लागणार प्रतीक्षा, आता ‘या’ तारखेला होणार आगमन, विदर्भात पावसाची हजेरी

Web Title: Maharashtra weather update rain break yellow alert july 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • imd
  • maharashtra
  • Monsoon Update

संबंधित बातम्या

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी
1

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी
2

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी

Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई
3

Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण
4

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.