Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRA Project: उच्च न्यायालयाच्या आदेशालाच हरताळ? मालाडमध्ये क्लासिक ट्रेझरचे कार्यालय जेसीबीने हटवल्याचा दावा

मुंबईतील मालाड (पूर्व) येथील खोत डोंगरी पुनर्विकास प्रकल्पात न्यायालयाने 'जैसे थे' परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले असतानाही क्लासिक ट्रेझर प्रायव्हेट लिमिटेडचे साईट ऑफिस हटवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित विभागाकडे दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 22, 2026 | 02:01 PM
उच्च न्यायालयाच्या आदेशालाच हरताळ? मालाडमध्ये क्लासिक ट्रेझरचे कार्यालय जेसीबीने हटवल्याचा दावा

उच्च न्यायालयाच्या आदेशालाच हरताळ? मालाडमध्ये क्लासिक ट्रेझरचे कार्यालय जेसीबीने हटवल्याचा दावा

Follow Us
Follow Us:
  • न्यायालयाची अवमानना कल्याचे एसएचपीएल वर गंभीर आरोप
  • मालाड खोत डोंगरी एसआरए प्रकल्प वाद
  • क्लासिक ट्रेझरची मुख्यमंत्री फडणवीसांकडे कारवाईची मागणी
मुंबई : मुंबईच्या मालाड (पूर्व) येथील खोत डोंगरी पुनर्विकास प्रकल्प न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही क्लासिक ट्रेझर प्रायव्हेट लिमिटेडचे साईट ऑफिस बेकायदेशीरपणे हटवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण कारवाईनंतर पोलीस आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण च्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असून याबाबत क्लासिक ट्रेझर्स चे संचालक नीलेश राघाणी यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित विभागाकडे केली आहे. हे संपूर्ण कट कारस्थान एसएचपीएल ( शाह हाऊसकॉन प्रा. ली.) कंपनीच्या चिथावणी वरून करण्यात आल्याचे क्लासिक ट्रेझरने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Maharashtra Rain Alert: अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

अधिक माहितीनुसार, खोत डोंगरी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे पुनर्विकासाचे अधिकार शाह हाऊसकॉन (एसएचपीएल) ने क्लासिक ट्रेझर कंपनीकडे हस्तांतरित केले होते. त्यानंतर एसएचपीएल ने एकतर्फी करार मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने नियुक्त केलेल्या लवादाने १२ मे २०२६ रोजी दोन्ही पक्षांना वादग्रस्त जागेवर ‘जैसे थे’ (Status Quo) परिस्थिती राखण्याचे कडक आदेश दिले होते.

तक्रारीनुसार, १८ जून २०२६ रोजी घर खाली न करणाऱ्या कुटुंबावर एसआरए कडून तोडू कारवाई करण्यात आली. दरम्यान कारवाईच्या नावाखाली सुमारे ३० ते ३५ अज्ञात इसमांनी क्लासिक ट्रेझरच्या सुरक्षा रक्षकांची बाजू न ऐकत जेसीबीच्या साहाय्याने त्यांचे कंटेनर ऑफिस उखडून रस्त्याच्या कडेला फेकून दिले. हा प्रकार शाह हाऊसकॉनच्या मनसुख शाह यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप आहे.

क्लासिक ट्रेझरचे बाधित विकासक निलेश राघानी यांनी तक्रार केल्यानंतर, दिंडोशी पोलिसांनी लेखी उत्तरात सांगितले की हे कंटेनर एसआरए विभागाने हटवले आहे. दुसरीकडे, जेव्हा निलेश राघाणी यांनी एसआरएशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी या प्रकरणावर पूर्णपणे मौन बाळगले. घटनेदरम्यान सुरक्षा रक्षकांनी आपत्कालीन क्रमांकावर फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, परंतु आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लवादाच्या आदेशाची प्रत सुपूर्द केल्यानंतरही, दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी बाधित पक्षाला पुन्हा न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.

नेमकी काय आहे विकासकाची मागणी?

क्लासिक ट्रेझरचे संचालक निलेश राघानी यांनी दिंडोशी पोलीस आणि डीसीपी परिमंडळ १२ यांच्याकडे लेखी तक्रार करून न्यायाची मागणी केली आहे. शाह हाऊसकॉनने पोलीस आणि एसआरएची दिशाभूल करून न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन केले आहे, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. त्यांनी या प्रकरणात सामील असलेल्या दोषींवर आणि गुंडांवर कडक कलमांखाली तात्काळ एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी केली आहे.

Medical Success Story: 20 वर्षीय तरुणीवर वॉकहार्टमध्ये यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह माइट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया

Web Title: Malad khot dongri sra redevelopment site office demolished despite status quo order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • sra

संबंधित बातम्या

Bombay HC Clerk Typing Test : मोठी बातमी ! हायकोर्टाच्या लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द; तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय
1

Bombay HC Clerk Typing Test : मोठी बातमी ! हायकोर्टाच्या लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द; तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.