Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

40 कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात भाजप आमदाराच्या भावाला उच्च न्यायालयाचा झटका; दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला!

युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या 40 कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकर यांचा दोषमुक्तीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 18, 2026 | 06:48 PM
arvind nilangekar and sambhaji nilangekar

arvind nilangekar and sambhaji nilangekar

Follow Us
Follow Us:
  • युनियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्ज प्रकरणात नेमकं काय घडलं?
  • गहाणखतामधील कथित फेरफाराबाबत CBI चा युक्तिवाद
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकरणाची चर्चा
 

लातूर : भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांच्याशी संबंधित कथित 40 कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांबाबत खटल्याची सुनावणी पुढे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नेमकं काय आहे 40 कोटींच्या कर्जाचं प्रकरण?

या प्रकरणाचा संबंध युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून 2009 मध्ये घेण्यात आलेल्या कर्जाशी आहे. उपलब्ध माहितीनुसार, मे. व्हिक्टोरिया अॅग्रो फूड प्रोसेसिंग प्रा. लि. या कंपनीला दोन्ही बँकांकडून सुमारे 40 कोटी रुपयांचं कर्ज मिळालं होतं. या कर्जासाठी काही स्थावर मालमत्ता गहाण ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं.

मात्र, कर्जासाठी नोंदवण्यात आलेल्या गहाणखतात कथित फेरफार करण्यात आल्याचा आरोप आहे. मूळ दस्तऐवजात निलंगा येथील सर्वे क्रमांक 289/अ मधील आठ हेक्टर जमिनीचा उल्लेख असताना, नंतरच्या नोंदींमध्ये सर्वे क्रमांक 5-अ मधील केवळ 740 चौरस फूट क्षेत्रफळाची मालमत्ता गहाण असल्याचं दर्शवण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.

Chandrakant Patil : ‘EVM असो वा बॅलेट पेपर, जिंकणार आम्हीच!’ चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला

25.50 कोटींची परतफेड; तरीही खटला सुरू राहणार?

या प्रकरणात कंपनीने बँकेचे 25.50 कोटी रुपये वन-टाइम सेटलमेंटद्वारे भरल्याचा मुद्दा पुढे आला. मात्र, बँकेची थकबाकी भरली म्हणजे कथित बनावटगिरी, फसवणूक किंवा कटाच्या आरोपांमधून आपोआप सुटका होत नाही, असा युक्तिवाद सीबीआयकडून करण्यात आल्याची माहिती आहे.

मालमत्तेच्या मूल्यांकनासाठी कागदपत्रं देणं, जागेच्या पाहणीवेळी उपस्थित राहणं आणि कर्जासंबंधीच्या फॉर्मवर स्वाक्षरी करणं, अशा बाबींचाही तपासात विचार करण्यात आला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा

दरम्यान, अरविंद पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल केल्याची माहिती आहे. त्यामुळे या न्यायालयीन प्रकरणाची राजकीय आणि सहकार क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.

आता या प्रकरणाच्या पुढील सुनावणीत काय घडतं आणि न्यायालयात कोणते पुरावे समोर येतात, याकडे लक्ष लागलं आहे.

Eknath Shinde : ‘मी धाडस केलं नसतं तर…’ शिवसेना बंडखोरीची आठवण काढत एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला

Web Title: Arvind patil nilangekar 40 crore loan case bombay high court vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • BJP
  • Bombay High Court
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Chandrakant Patil : ‘EVM असो वा बॅलेट पेपर, जिंकणार आम्हीच!’ चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला
1

Chandrakant Patil : ‘EVM असो वा बॅलेट पेपर, जिंकणार आम्हीच!’ चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल
2

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल

राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार? अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; तर तरुण आमदारांना…
3

राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार? अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; तर तरुण आमदारांना…

शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपसमोर आव्हान! नंदनवनवरील बैठकीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण
4

शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपसमोर आव्हान! नंदनवनवरील बैठकीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.