Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHADA Lottery 2026: घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! ठाणे, कल्याण, डोंबिवलीत म्हाडाची २ हजार घरे; ‘या’ महिन्यात निघणार लॉटरी

MHADA Konkan News: म्हाडा कोकण मंडळ फेब्रुवारी २०२६ मध्ये २ हजार घरांची लॉटरी जाहीर करणार आहे. ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीतील घरांसाठी एप्रिल-मे महिन्यात सोडत निघेल. जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 12, 2026 | 08:01 PM
घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! (photo Credit- X)

घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी!
  • ठाणे, कल्याण, डोंबिवलीत म्हाडाची २ हजार घरे
  • ‘या’ तारखेला निघणार लॉटरी
MHADA Konkan Lottery News: मुंबई आणि आसपासच्या परिसरात स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) लवकरच कोकण मंडळांतर्गत २ हजार पेक्षा जास्त घरांची सोडत जाहीर करणार आहे. वाढत्या महागाईत परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध होणार असल्याने ठाणे, कल्याण आणि डोंबिवली पट्ट्यातील घरांसाठी इच्छुकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

फेब्रुवारीत जाहिरात, मे महिन्यात सोडत

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून फेब्रुवारी २०२६ मध्ये या नवीन घरांच्या लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी करून एप्रिल किंवा मे २०२६ मध्ये प्रत्यक्ष सोडत प्रक्रिया पार पडेल. मुंबई मंडळाची ऑक्टोबरमधील लॉटरी पुरेशी घरे उपलब्ध नसल्याने पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे आता सर्वांचे लक्ष कोकण मंडळाच्या या लॉटरीकडे लागले आहे.

कुठे उपलब्ध असणार घरे?

कोकण मंडळाची ही घरे प्रामुख्याने खालील विकसित आणि मागणी असलेल्या भागांमध्ये असतील:

ठाणे

कल्याण

डोंबिवली

घोटकोपर

दक्षिण मुंबईतील २० लाख रहिवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १३,८०० इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार; म्हाडाचा मोठा निर्णय

अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी सुवर्णसंधी

या लॉटरीमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे घरांचे साठे असतील. पहिले म्हणजे खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळणारी १५ आणि २० टक्के आरक्षित घरे, आणि दुसरे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) उपलब्ध होणारी घरे. यामुळे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत हक्काचे घर घेण्याची संधी मिळणार आहे.

विक्रमी प्रतिसादाची शक्यता

ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील म्हाडाच्या घरांना नेहमीच मोठा प्रतिसाद मिळतो. २०२५ मध्ये ५ हजार घरांसाठी तब्बल १.५० लाखांहून अधिक अर्ज आले होते. मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने, सर्वसामान्यांसाठी म्हाडा हा एकमेव भरवशाचा पर्याय उरला आहे. त्यामुळे यंदाच्या २ हजार घरांच्या लॉटरीसाठीही मोठी चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे काय?

इच्छुक नागरिकांनी आपले ‘म्हाडा प्रोफाईल’ अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि Domicile Certificate तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई मंडळाच्या लॉटरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी कोकण मंडळाची ही घोषणा ‘नव्या वर्षाची मोठी भेट’ ठरणार आहे.

Mhada Lottery : स्वस्तात घर खरेदी करण्याची शेवटची संधी, ४१८६ घरांसाठी म्हाडाची लॉटरी, शेवटची तारीख कधी?

Web Title: Mhada lottery 2026 thane kalyan dombivli 2000 houses registration date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • MHADA Lottery
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा
1

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा
2

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या
3

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.