Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कामगारांच्या कष्ट आणि योगदानामुळेच महाराष्ट्राचे…”; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी बलिदान दिले त्या हुतात्म्यांचे योगदान अमूल्य आहे. आजचे राज्याचे वैभव हे कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या परिश्रमाचे फलित आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 02, 2026 | 02:35 AM
“कामगारांच्या कष्ट आणि योगदानामुळेच महाराष्ट्राचे…”; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?
Follow Us
Follow Us:

लोढा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन
मंत्री लोढा यांनी सर्व कामगारांना दिल्या कामगार दिनाच्या शुभेच्छा
पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धन ही काळाची गरज

मुंबई: कामगारांच्या कष्ट आणि योगदानामुळेच महाराष्ट्राचे वैभव उभे राहिले असून राज्य प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. ध्वजवंदनास जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापुरे, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, महेश हरिश्चंद्रे, महादेव किरवले, प्रशांत पानवेकर, भूमी अभिलेख अधीक्षक धनाजी धायगुडे, आणीबाणी काळात कारावास भोगलेले स्वातंत्र्यसेनानी तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रमास उपस्थित राहिलो. महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा मनापासून अभिमान आहे.#FlagHoisting #MaharashtraDay #MaharashtraDin pic.twitter.com/RpGkA38ouZ — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) May 1, 2026

यावेळी मंत्री लोढा यांनी सर्व कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. लोढा म्हणाले, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी बलिदान दिले त्या हुतात्म्यांचे योगदान अमूल्य आहे. आजचे राज्याचे वैभव हे कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या परिश्रमाचे फलित आहे. वाढत्या पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धन ही काळाची गरज असून नागरिकांनी यासाठी यासाठी सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर, प्रशासनातील अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत सर्वांनी एकत्रितपणे राज्याच्या विकासासाठी कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

“महाराष्ट्रात कुशल, प्रामाणिक आणि…”; ‘महाचतुर एआय चॅटबॉट’ बाबत काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर 30व्या क्रमांकावर पोहोचल्याचा उल्लेख करत त्यांनी याबाबतचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिले. मात्र, राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी केवळ शासनाचे प्रयत्न पुरेसे नसून प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडणे गरजेची आहे, असे सांगत त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाचाही उल्लेख केला.

महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून संत, विचार आणि शौर्याची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान, महात्मा फुले यांचे विचार आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या बळावर महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे, असे गौरवोद्गार मुंबई शहर जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी काढले.

“महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या गेमिंग क्षेत्रात…”; Mangal Prabhat Lodha यांनी व्यक्त केला विश्वास

जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या, आपल्यासमोर उभारलेल्या पायाभूत सुविधा हे कामगारांच्या कष्टाचे फलित आहे. शेतकरी, कारखान्यातील कामगार तसेच बांधकाम क्षेत्रातील मजूर यांचे खरे देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान आहे. सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडून राज्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन करत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

Web Title: Minister mangal prabhat lodha flag hoasting maharashtra day mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ
1

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा
2

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
3

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग
4

मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.