Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai BEST Employee Strike:  वेतन-ग्रेच्युइटीच्या मागणीसाठी BEST कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र; आजपासून बेमुदत उपोषण

Mumbai BEST Employee Strike: मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी BEST Workers Unionने आज, १८ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वेट लीज कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी व अंतिम थकबाकी देण्याची युनियनची प्रमुख मागणी आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 18, 2026 | 12:11 PM
मुंबईकरांच्या अडचणीत वाढ! वेतन-ग्रेच्युइटीच्या मागणीसाठी BEST कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र; आजपासून बेमुदत उपोषण

मुंबईकरांच्या अडचणीत वाढ! वेतन-ग्रेच्युइटीच्या मागणीसाठी BEST कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र; आजपासून बेमुदत उपोषण

Follow Us
Follow Us:
  • वेतन-ग्रेच्युइटीच्या मागणीसाठी BEST कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र
  • आजपासून बेमुदत उपोषण
  • वेट लीज कर्मचाऱ्यांचाही मुद्दा ऐरणीवर
Mumbai BEST Employee Strike News In Marathi: मुंबईतील बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून BEST Workers Unionने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. युनियनचे महासचिव शशांक राव यांनी १८ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रलंबित वेतन करार लागू करण्याची मागणी

BEST कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले वेतन करार तातडीने लागू करण्यात यावेत, अशी युनियनची प्रमुख मागणी आहे. विशेषतः २०१६ ते २०२१ आणि २०२१ ते २०२६ या कालावधीतील वेतन करारांची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय BEST कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी व सुविधा मिळाव्यात, अशीही मागणी युनियनने केली आहे.

BEST Bus Action: BEST बसचालकांसाठी नवा नियम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात अधिकारी ठेवणार पाळत

वेट लीज कर्मचाऱ्यांचाही मुद्दा ऐरणीवर

BESTच्या वेट लीज व्यवस्थेअंतर्गत खासगी कंपन्यांच्या माध्यमातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्नही युनियनने उपस्थित केला आहे. या कर्मचाऱ्यांना ‘समान कामासाठी समान वेतन’ या तत्त्वानुसार वेतन आणि इतर सुविधा मिळाव्यात, अशी मागणी आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीचा प्रश्न

सेवानिवृत्त BEST कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर अंतिम थकबाकीची रक्कम वेळेत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्यासाठी विलंब होत असल्याचा मुद्दा युनियनने मांडला आहे.

BESTच्या आर्थिक परिस्थितीवरही प्रश्न

BEST उपक्रमाच्या आर्थिक अडचणींचा मुद्दाही युनियनने उपस्थित केला आहे. BESTचे कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला आर्थिक निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

उपोषण कुठे आणि कधी?

BEST Workers Unionच्या घोषणेनुसार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबईतील ऑपेरा हाऊस परिसरातील ४२, केनेडी ब्रिज येथील BEST Workers Unionच्या कार्यालयात बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे.

या आंदोलनात BESTच्या विद्यमान कर्मचाऱ्यांसोबतच वेट लीज बस कर्मचाऱ्यांच्या तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्याही मांडल्या जाणार आहेत. मागण्यांवर निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार युनियनने व्यक्त केला आहे.

BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन

Web Title: Mumbai best employee strike salary gratuity demands indefinite hunger strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • best bus
  • Mumbai

संबंधित बातम्या

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह
1

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह

Income Tax Office Fire: सोमवार ठरला आगीचा! चर्चगेटमधील आयकर कार्यालयाला आग, विराज प्रोफाईल कंपनीत भीषण स्फोट
2

Income Tax Office Fire: सोमवार ठरला आगीचा! चर्चगेटमधील आयकर कार्यालयाला आग, विराज प्रोफाईल कंपनीत भीषण स्फोट

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
3

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
4

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.