Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा; महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

Mumbai Marathi Board Compulsory: मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याबाबत महापालिकेने शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. सेलिब्रिटींची हॉटेल्स आणि मोठ्या कंपन्यांवर प्रथम कारवाई होणार असून, नियम न पाळल्यास परवाने रद्द होईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 14, 2026 | 03:47 PM
मुंबईत 'मराठी पाट्या' सक्तीचा शेवटचा अल्टिमेटम (Photo Credit- X)

मुंबईत 'मराठी पाट्या' सक्तीचा शेवटचा अल्टिमेटम (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • मुंबईत ‘मराठी पाट्या’ सक्तीचा शेवटचा अल्टिमेटम
  • सेलिब्रिटींची हॉटेल्स आणि मोठ्या कंपन्यांवर प्रथम कारवाईचा बडगा
मुंबई: मुंबईच्या अस्मितेचा विषय असलेल्या ‘मराठी देवनागरी’ फलकांबाबत मुंबई महानगरपालिका आता ॲक्शन मोडमध्ये आली आहे. शहरातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्याबाबत पालिकेने शेवटचा इशारा दिला असून, पुढील महिनाभरात नियमांचे पालन न करणाऱ्यांवर थेट कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा उपमहापौर संजय घाडी यांनी केली.

बड्या माशांपासून होणार कारवाईला सुरुवात

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे पालिकेने आपला मोर्चा प्रथम मोठ्या आस्थापनांकडे वळवला आहे. सेलिब्रिटींची हॉटेल्स, पंचतारांकित आस्थापना आणि मोठी कॉर्पोरेट कार्यालये. मोठ्या आस्थापनांनी नियमांचे पालन केल्यास छोटे दुकानदार त्यांचे आपसूक अनुकरण करतील, असे मत उपमहापौर संजय घाडी यांनी व्यक्त केले. अनेक बड्या हॉटेल्सना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या असून, आता प्रत्यक्ष कारवाईची प्रक्रिया सुरू होणार आहे.

प्रशासनाचे टोचले कान; सर्वेक्षणाची गती वाढवण्याचे निर्देश

मुंबईत सुमारे नऊ लाख नोंदणीकृत दुकाने आहेत, परंतु केवळ सव्वा ते दीड लाख ठिकाणांचेच सर्वेक्षण पूर्ण झाल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. उर्वरित सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

BMC School : पालिकेच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी! गुणवंतांचा भव्य सत्कार; आयुक्त अश्विनी भिडे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

असे असेल कारवाईचे स्वरूप

महापालिकेने पुढील ३० दिवसांचे नियोजन स्पष्ट केले आहे:

  1. पहिला टप्पा (१५ दिवस): नियमबाह्य फलक असलेल्या दुकानांची अंतिम यादी तयार करणे आणि प्रलंबित नोटिसांचा आढावा घेणे.
  2. दुसरा टप्पा (पुढील १५ दिवस): दंडात्मक कारवाई सुरू करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया राबवणे.

विधी समितीचा कडक पवित्रा

मराठी भाषा आणि देवनागरी फलक हा मुंबईच्या ओळखीचा विषय असून यात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर यांनी ठणकावून सांगितले. जून महिन्यात होणाऱ्या बैठकीत २६ वॉर्डमधील निरीक्षकांच्या कामाचा आढावा घेतला जाईल आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत.

Mumbai News: पालिकेच्या मुदतठेवींत मोठी घट! तीन वर्षांत तब्बल ८ हजार कोटी रुपयांच्या निधीवर मारला डल्ला

Web Title: Mumbai bmc last ultimatum for marathi signboards on shops and establishments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं
1

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

Mumbai Water Crisis : मुंबईच्या पाणीसाठ्यावर संकट! सात धरणांत फक्त 7% पाणी, जुलैच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष
2

Mumbai Water Crisis : मुंबईच्या पाणीसाठ्यावर संकट! सात धरणांत फक्त 7% पाणी, जुलैच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष

मेट्रोसारखी सुरक्षा लोकलमध्ये राबवणे कठीण! प्रशासन सतर्क सीसीटीव्ही वाढवण्यावर भर; आव्हानांवर मात करण्याचा पोलिसांचा भर
3

मेट्रोसारखी सुरक्षा लोकलमध्ये राबवणे कठीण! प्रशासन सतर्क सीसीटीव्ही वाढवण्यावर भर; आव्हानांवर मात करण्याचा पोलिसांचा भर

Mumbai Crime: मोबाईलवर अश्लील मेसेज, भेटीसाठी दबाव अन् धमकी; अल्पवयीन दिराने वहिनीविरोधात केली तक्रार
4

Mumbai Crime: मोबाईलवर अश्लील मेसेज, भेटीसाठी दबाव अन् धमकी; अल्पवयीन दिराने वहिनीविरोधात केली तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.