Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive : जखम पोटाला प्लॅस्टर पाठीला! रखडलेला पुनर्विकास, तुटके बांधकाम…, मुंबईतील जगन्नाथ चाळीचं घोडे अडले कुठे?

मुंबईतील गिरगावमधील जगन्नाथ चाळ (झाऊबा वाडी) पुनर्विकास प्रकल्प गेल्या 14 वर्षांपासून रखडल्याने रहिवाशांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. विकासकाकडून झालेल्या विलंबामुळे रहिवाशांनी कायदेतज्ज्ञांची मदत घेतली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 28, 2026 | 06:36 PM
जखम पोटाला प्लॅस्टर पाठीला! रखडलेला पुनर्विकास, तुटके बांधकाम..., मुंबईतील जगन्नाथ चाळीचं घोडे अडले कुठे?

जखम पोटाला प्लॅस्टर पाठीला! रखडलेला पुनर्विकास, तुटके बांधकाम..., मुंबईतील जगन्नाथ चाळीचं घोडे अडले कुठे?

Follow Us
Follow Us:

Jagannath Chawl Redevelopment News Marathi : गेली 130 पेक्षा जास्त वर्ष आपले पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या लाकडी चाळी म्हणजे मुंबईतील गिरगाव येथील जगन्नाथ चाळ झाऊबा वाडी. दरवर्षी पावसाळा आला की, मुंबईतील जुन्या, धोकादायक चाळी, इमारतींतील रहिवाशांसमोरील चिंतेचे ढग गडद होतात. अशीच परिस्थिती गिरगाव येथील जगन्नाथ चाळ झाऊबा वाडीमध्ये दिसून येत आहे. १४ वर्षांपासून पुनर्विकास रखडल्याने विकासक आणि म्हाडाच्या कारभाराविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

मुंबईतील जगन्नाथ चाळ व झाओबावाडी येथील पुनर्विकास प्रकल्प मागील सुमारे १४ वर्षांपासून पूर्णपणे ठप्प अवस्थेत आहे. या प्रकल्पात राहणाऱ्या भाडेकरूंना आजही अत्यंत जीर्ण, असुरक्षित व जीवितास धोका निर्माण करणाऱ्या इमारतींमध्ये राहण्यास भाग पाडले जात आहे. या प्रकल्पासाठी विकासकाची नियुक्ती करण्यात आलेली असतानाही, कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. विकासकाकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या आश्वासनांनंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

मोठी बातमी! KEM हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडूनही हिरवा कंदील, ‘उबाठा’चा विरोध; तर मंगलप्रभात लोढा यांचा पलटवार

तसेच, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनही या प्रकरणात अपेक्षित ती दखल घेतली जात नसल्याचे दिसून येते. वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने हा प्रकल्प अधिकच रखडत चालला आहे. परिणामी, नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याशिवाय, अनेक रहिवाशांना पर्यायी निवास, भाडे किंवा ट्रान्झिट सुविधांबाबतही अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही प्रकरणांमध्ये भाडे देण्यात उशीर, तर काही ठिकाणी ते पूर्णपणे थांबवण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर, संबंधित प्राधिकरणांनी तातडीने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून विकासकाविरुद्ध कठोर कारवाई करावी, प्रकल्पाला गती द्यावी आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत रहिवाशांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि आर्थिक मदत तत्काळ उपलब्ध करून द्यावी.

14 वर्षापासूनचा घटनाक्रम

२०११ – प्रमाण इन्फ्रास्ट्रक्टचर यांनी चाळी व झाओबावाडीतील इतर मालमत्ता खरेदी केल्या.
२०१३ – ९९% बहुमताने भाडेकरूंनी MHADA 33(7) योजनेअंतर्गत MOU व कन्सेंट दिले.
२०१३ – MHADA कडून पडताळणी पूर्ण होऊन भाडेकरूंना प्रमाणित रहिवासी (Certified Occupants) दर्जा देण्यात आला.
२०१४ – विकासकाने आवश्यक NOC प्राप्त केल्या.
२०१४–२०१५ – पुनर्विकासात कोणतीही प्रगती नाही.
२०१५ – NOC कालबाह्य होऊन पुन्हा नूतनीकरण करण्यात आले.
२०१६ – कोणतीही कारवाई नाही.
२०१७ – NOC कालबाह्य; त्यानंतर प्रकल्प पूर्णतः ठप्प.
२०१७ ते २०२२ – विकासकाने अतिरिक्त मालमत्ता घेतल्या पण पुनर्विकास सुरू केला नाही.
२०२२ – भाडेकरूंना WC व उपभाडेकरू बाबत कायदेशीर नोटिसा पाठविण्यात आल्या.
२०२२ – भाडेकरूंनी स्थानिक आमदार व सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे विषय मांडला.
२०२२–२०२३ – सभापती व MHADA रिपेअर बोर्ड यांच्यासोबत दोन बैठका; विकासकावर कारवाई न झाल्यास NOC रद्द करण्याचे स्पष्ट संकेत.
२०२३ – विकासकाने ८७०० चौ.मी. क्लस्टर प्रस्तावित केला व नवीन MOU दिला. भाडेकरूंनी प्रतिकूल अटी असूनही ९–१२ महिन्यांत प्रकल्प सुरू करण्याच्या अटीवर सहमती दर्शवली.
२०२४ – म्हाडा रिपेअर बोर्ड, सभापती, विकासक व भाडेकरू यांच्यासोबत बैठक घेऊन पुन्हा आश्वासने.
२०२४ – भाडेकरूंनी वकील नेमून MHADA सोबत अधिकृत पत्रव्यवहार सुरू केला.
२०२४ – मुख्य अधिकाऱ्यांसमोर सुनावणी; पुन्हा आश्वासने.
२०२५ – म्हाडाचे उपाध्यक्ष आयएएस संजीव जैस्वाल यांच्यासोबत बैठकीनंतर पुन्हा आश्वासने
२०२५ – भाडेकरूंविरुद्ध बेदखलीच्या अनेक खटल्यांची नोंद.
२०२५ – विकासकाच्या प्रशासनिक त्रुटी, आर्थिक अपुरेपणा व कायदेशीर उल्लंघन यावर आधारित रिट याचिका दाखल.
२०२५ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक; MHADA मार्फत 79(1)(B)/91(A) अंतर्गत प्रकल्प ताब्यात घेण्याचे आश्वासन.
२०२६ – MHADA कडून अयोग्य पडताळणी (घराघरांत न करता एका ठिकाणी) नियमांचे उल्लंघन
२०२६ – ८ एप्रिल रोजी पुन्हा जैस्वाल यांच्यासोबत बैठक; कोणतीही ठोस कारवाई नाही.
२०२६ – रिट याचिका न्यायालयाने ग्राह्य धरली असून पुढील युक्तिवादासाठी निश्चित.
२०११–२०२६ – कोणतीही दुरुस्ती नाही; इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत.

केवळ आश्वासने

● विकासकाने सातत्याने अपयश व विलंब
● म्हाडा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आश्वासने देण्यात आली मात्र कोणतीही ठोस अंमलबजावणी झाली नाही
● नियमबाह्य पडताळणीसारख्या गंभीर प्रक्रिया त्रुटी झालेल्या आहेत
● भाडेकरूंना न्याय मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा उभारावा लागला आहे.
आज या प्रकल्पातील शेकडो कुटुंबे अत्यंत धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत, ज्यामुळे त्यांचे जीवितही धोक्यात आले आहे. 14 वर्षांच्या विलंबानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.

Mumbai News: पावसाळ्यापूर्वी २६ हजार झाडांची छाटणी! ७ जूनपर्यंत वृक्षछाटणी करण्याचे महापालिका प्रशासनाचे लक्ष्य

काय आहेत मागण्या?

1. विकासकास दिलेल्या सर्व NOC तात्काळ रद्द करून त्याबाबतचे अधिकृत पत्र देण्यात यावे.
2. 33(9) अंतर्गत झालेली अलीकडील पडताळणी ही MHADA प्रक्रियेनुसार नसल्यामुळे ती रद्द करण्यात यावी.
3. विकासकाच्या सातत्यपूर्ण अपयशामुळे त्याला पुढील कोणतेही विकासकाम करण्यास परवानगी देऊ नये.
4. ९ एप्रिल २०२५ च्या बैठकीत मागवलेला तांत्रिक अहवाल (४५० चौ.फुट प्रस्तावाबाबत) उपलब्ध करून द्यावा.
5. म्हाडा आणि विकासकाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे म्हाडाने पुढाकार घेऊन तात्काळ दुरुस्ती करावी.

Web Title: Mumbai jagannath chawl redevelopment delay issues news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • mhada
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष
1

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा
2

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा
3

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या
4

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.