Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरीसाठी पुन्हा मराठी उमेदवारांना डावललं? 25 लाखांच्या पॅकेज पण ‘Only Gujarati, Marwadi Candidate’, लिंक्डइनवरील जॉब पोस्ट वादात

Marathi Gujarati Dispute Jobs Advertise Mumbai : मुंबईतील एका खासगी कंपनीच्या नोकरी जाहिरातीवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. लिंक्डइनवर पोस्ट करण्यात आलेल्या वार्षिक २५ लाखांच्या पॅकेजच्या नोकरीसाठी ‘फक्त गुजराती किंवा मारवाडी उमेदवारांनी अर्ज करावा’ अशी अट घालण्यात आल्याचा आरोप होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 10, 2026 | 12:14 PM
नोकरीसाठी पुन्हा मराठी उमेदवारांना डावललं? 25 लाखांच्या पॅकेज पण ‘Only Gujarati, Marwadi Candidate’, लिंक्डइनवरील जॉब पोस्ट वादात (फोटो सौजन्य-ChatGPT)

नोकरीसाठी पुन्हा मराठी उमेदवारांना डावललं? 25 लाखांच्या पॅकेज पण ‘Only Gujarati, Marwadi Candidate’, लिंक्डइनवरील जॉब पोस्ट वादात (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत नोकरी मराठी उमेदवारांना नकार
  • सोशल मीडियावर जाहिरातीतून नवा भाषिक वाद
  • नोकरी.कॉम आणि लिंकडिनवर जाहिरात
  • गुजराती आणि मारवाडी उमेदवारांनाच संधी
  • अहमदाबादमधील एजन्सीची वादग्रस्त जाहिरात
Marathi Gujarati Dispute Jobs Advertise Mumbai: मुंबईत मराठी आणि अमराठी समुदायांमधील वाद काही नवीन नाही. पण मुंबईतील नोकऱ्यांमध्ये आता मराठी माणसांसाठी जागा उरली नाही का? असं एक प्रकरण देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतून एक वादग्रस्त प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

मुंबईतील एका खासगी कंपनीने लिंक्डइन या व्यावसायिक सोशल नेटवर्किंग साइटवर नोकरीची जाहिरात दिली असून, त्यात फक्त गुजराती किंवा मारवाडी उमेदवारांनाच अर्ज करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे, वार्षिक २५ लाख रुपयांच्या पगाराची ऑफर देणाऱ्या या जाहिरातीत, ‘ओन्ली गुजराती, मारवाडी कॅन्डीडेट’ असे नमूद केले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी आरोप केला आहे की, मराठी लोकांना पुन्हा एकदा जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे.

वाढत्या तापमानाचा फटका शाळांनाही; शाळा 22 जूनपासून होणार सुरु

“मराठी का नाही?” असा प्रश्न उपस्थित करत, महाराष्ट्र एकीकरण समितीने या जाहिरातीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. समितीने म्हटले आहे की, ते दोन दिवसांत संबंधित कंपनीची ओळख पटवून थेट कारवाई करतील. तसेच, या प्रकरणाच्या पुढील कोणत्याही परिणामांसाठी सरकारला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही समितीने दिला आहे.

समितीने तात्काळ गुन्हा दाखल करून कंपनी आणि जबाबदार व्यक्तींवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मराठी नावावरील हिंसाचाराला विरोध करणारे मुख्यमंत्री, या प्रकरणात संबंधित प्रशासनाला कारवाई करण्याचे आणि राज्यात अशा घटनांना प्रतिबंध करण्याचे आदेश देतील का, असा प्रश्न गोवर्धन देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईत मराठी माणसांना पुरेसा रोजगार मिळत नाही आणि परराज्यातील किंवा गुजराती कंपन्या मराठी उमेदवारांना प्राधान्य देत नाहीत, हा मुद्दा गोवर्धन देशमुख यांनी बऱ्याच काळापासून उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, मराठी माणसांच्या रोजगाराचा आणि जगण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे आणि नोकरी व व्यवसायात मराठी लोकांना प्राधान्य दिल्यासच परिस्थितीत बदल होईल.

गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये गिरगावमध्ये असेच एक प्रकरण समोर आले होते. एका खासगी कंपनीने ग्राफिक डिझायनर पदासाठी लिंक्डइनवर दिलेल्या पोस्टमध्ये कथितरित्या म्हटले होते, “मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये.” यामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले होते की, “मुंबईत मराठी लोकांना नोकऱ्या नाकारल्या जात आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. गुजराती नेते अधिक आत्मविश्वासू झाले आहेत.”

Mumbai News: रेसकोर्सवरील वृक्षतोडीचा अहवाल दडपला! किती झाडे तोडली याबाबत महानगरपालिका अनभिज्ञ; विकासकाला ‘अल्टिमेटम’

Web Title: Mumbai job post gujarati marwadi candidates only controversy news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

दिल्लीतील लाठीमारानंतर उद्धव ठाकरे आक्रमक! सरकारला दिला ‘हा’ मोठा इशारा; म्हणाले- ‘तुम्ही लाठ्या-बंदुका घेऊन या, मी…’
1

दिल्लीतील लाठीमारानंतर उद्धव ठाकरे आक्रमक! सरकारला दिला ‘हा’ मोठा इशारा; म्हणाले- ‘तुम्ही लाठ्या-बंदुका घेऊन या, मी…’

FDA On BMC Canteen: मुंबई महापालिका कँटीनवर FDAचा दणका; ताकात माशी सापडल्याने कँटीन सील करण्याचे निर्देश
2

FDA On BMC Canteen: मुंबई महापालिका कँटीनवर FDAचा दणका; ताकात माशी सापडल्याने कँटीन सील करण्याचे निर्देश

Jantar Mantar Protest : ‘विद्यार्थ्यांना मिळाली रफ्तार’ रस्त्यावर उतरली रॅपर मंडळी! Emiway नेही दिली साथ
3

Jantar Mantar Protest : ‘विद्यार्थ्यांना मिळाली रफ्तार’ रस्त्यावर उतरली रॅपर मंडळी! Emiway नेही दिली साथ

Thackeray Brothers: महाराष्ट्र पेटणार! विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार; २६ जुलैला मुंबईत ‘संयुक्त मोर्च’
4

Thackeray Brothers: महाराष्ट्र पेटणार! विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार; २६ जुलैला मुंबईत ‘संयुक्त मोर्च’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.