फोटो सौजन्य सोशल मिडिया
&
Look who came for dinner unexpectedly. ‘Roachie’ – a baby *cockroach was on our table wanting to share our dinner at the Romano restaurant at JW Marriott , Sahar , Mumbai, Saturday night*!!! Despite our persuasion ‘ Roachie’ refused to leave . Maybe wanted Piazza and not… pic.twitter.com/w1h92KZiaU — Dr. Ashok Seth (@Dr_AshokSeth) September 20, 2026
nbsp;
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांनी जेडब्ल्यू मॅरियट सहार येथील ‘रोमानो’ रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले असता ‘रोची’ (Roachie) नावाचा एक झुरळाचा पिल्लू आमच्या टेबलावर आलं, त्याला सुद्धा आमच्या जेवायचे होते,आम्ही खूप समजावूनही ‘रोची’ तिथून जायला तयार नव्हता. कदाचित त्याला पास्ता नको, तर पिझ्झा हवा असावा. पण त्याने आमची भूक मात्र नक्कीच उडवली. आम्ही तिथून निघून आलो. डॉ. अशोक सेठ यांनी झुरळाला मिश्किल पणे ‘ रोची ‘ असे नाव दिले आहे. त्यांनी या घटनेचा प्रकार आपल्या मोबाईल मध्ये कैद करत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अधिकारी ( FDA ) तुकाराम मुंडे यांना घडलेल्या प्रकाराबाबत हाॅटेलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे .
Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
हाॅटेलमध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी यासाठी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांनी हाॅटेल जेडब्ल्यू मॅरियट वर ग्राहक सेवा विभागा द्वारे या घटनेची दखल घेतली जाईल असे स्पष्ट उत्तर दिले, तर हाॅटेलच्या स्वयंपाकघराकडून कोणत्याही प्रकारचे निवेदन आले नाही.
मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट सहार येथील ‘रोमानो’ रेस्टॉरंटमध्ये घडलेला प्रकार या अत्यंत निंदनिय आहे. फाइव्ह स्टार हॉटेलमधील या अस्वच्छतेच्या प्रकारामुळे नागरिकांच्या प्रश्नावर पुन्हा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे . महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (FDA) हे नामांकित हाॅटेलवर कारवाई करुन त्यांचा परवाना रद्द करत आहे. या अनुशंगाने मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट सहार येथील ‘रोमानो’ रेस्टॉरंटवर कारवाई होईल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेचा व्हिडिओ शेअर करत डॉ. सेठ यांनी महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (FDA) FSSAI आणि हॉटेलच्या प्रशासनाला टॅग केले असून याप्रकरणी कडक कारवाईची करण्यात यावी अशी मागणी केली आहे.






