Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: ठाणे-मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठ्या मागण्या; ४८ प्रवासी संघटनांची रविंद्र चव्हाणांसोबत बैठक

Mumbai Local Train 48 Associations Meet Ravindra Chavan: ठाणे-मुंबई परिसरातील ४८ रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन उपनगरीय रेल्वेची क्षमता, सुरक्षितता आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्याबाबत विविध मागण्या मांडल्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 27, 2026 | 08:30 PM
Mumbai Local Train 48 Associations Meet Ravindra Chavan

Mumbai Local Train 48 Associations Meet Ravindra Chavan

Follow Us
Follow Us:
  • ठाणे-मुंबई लोकलचा प्रवास होणार सुकर?
  • लोकल प्रवाशांच्या प्रश्नांवर ४८ संघटना आक्रमक
  • कळवा-ऐरोलीसह रेल्वे प्रकल्पांना गती देण्याची मागणी

मुंबई : ठाणे-मुंबई परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रश्नांवरून प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ठाणे-मुंबई परिसरातील तब्बल ४८ रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची डोंबिवली जिमखाना येथे भेट घेतली. यावेळी मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता, सुरक्षितता आणि थेट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासह प्रवाशांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?

या बैठकीत प्रवासी संघटनांनी कळवा-ऐरोली रेल्वे लिंक तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. याशिवाय बदलापूर-कर्जत तसेच कल्याण-कसारा मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनच्या कामांना गती देण्याची मागणी करण्यात आली. ठाणे-कर्जत आणि ठाणे-कसारा शटल सेवा सुरू करण्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला.लोकलच्या फेऱ्यांमधील अंतर म्हणजेच हेडवे कमी करण्यासाठी आधुनिक सिग्नलिंग प्रणालीचा वापर करावा, अशी मागणीही प्रवासी संघटनांनी केली. तसेच दिवा-वसई-पनवेल थेट कनेक्टिव्हिटी वाढवणे, कल्याण जंक्शनची क्षमता वाढवणे आणि सीएसएमटीपर्यंतच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी Airoli-Kalwa लिंक, Kalyan-Badlapur तिसरी-चौथी मार्गिका आणि Kalyan-Kasara तिसरी मार्गिका यांसारखी विविध कामे रेल्वेच्या प्रकल्पांमध्ये समाविष्ट आहेत. अधिकृत माहितीनुसार, Airoli-Kalwa उन्नत लिंक प्रकल्पाची लांबी सुमारे ३.३ किलोमीटर आहे, तर Kalyan-Kasara तिसऱ्या मार्गिकेचे कामही सुरू आहे.
प्रवासी संघटनांनी आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन रविंद्र चव्हाण यांच्याकडे सादर केले. या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

रेल्वेची क्षमता वाढवणे, प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले, भालचंद्र लोहकरे, नवरे काका, मधुताई कोटियन, लताताई आरगडे, नंदकुमार देशमुख, अनिताताई, वंदनाताई सोनवणे, सिद्धेश देसाई, अनिकेत घमंडी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

‘कुरिअर नेटवर्कमधून कोटींचे सोने देशभर’; नऊ महिन्यांत ३१८ किलो सोन्याची तस्करी, ११ जणांना अटक

Web Title: Mumbai local thane 48 passenger associations ravindra chavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Minister Ravindra Chavan
  • Mumbai Local
  • Mumbai local train

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.