Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local: ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात सापाची अफवा; 12 मिनिटे लोकल ठप्प, प्रवाशांमध्ये घबराट

Mumbai Local: ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात साप दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. महिलांनी अलार्म चेन ओढल्याने लोकल 12 मिनिटे थांबवण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने तपासणी केली असता डब्यात काहीही आढळले नाही. त्यानंतर लोकल सुरक्षित असल्याची खात्री करून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 07, 2026 | 11:36 AM
ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात सापाची अफवा; 12 मिनिटे लोकल ठप्प, प्रवाशांमध्ये घबराट (फोटो सौजन्य-ChatGPT)

ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात सापाची अफवा; 12 मिनिटे लोकल ठप्प, प्रवाशांमध्ये घबराट (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात साप दिसल्याची माहिती
  • अलार्म चेन पुलिंग केल्याने लोकल तातडीने थांबवली
  • सकाळी ९.१४ ते ९.२६ या वेळेत लोकल १२ मिनिटे खोळंबली
  • गाडी ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून सुटल्यानंतर घटना
Mumbai Local News Marathi: मध्य रेल्वे असो किंवा पश्चिम रेल्वे… मुंबईतल्या लोकलमध्ये सकाळच्या वेळेत गर्दीशिवाय काहीही दिसणार नाही, इतकी खचाखच लोकं भरलेली असतात. लोकलमध्ये जागा करण्यात मुंबईकरांचा प्रवास कधी संपतो तेही कळत नाही. नेहमी इतर सहप्रवाश्ांना आगे चलो, उधर खिसको, नीच देख ना जरा, धक्का कायको देता है…असं म्हणत आरडाओरडा करणारा मुंबईकर लोकल प्रवासी शुक्रवारी (7 ऑगस्ट) मात्र गप्पगार झाला होता.सकाळी 9.14 ते 9.26 या वेळेत लोकल तब्बल 12 मिनिटे थांबवावी लागली.कारण ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात साप दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्य रेल्वेच्या लोकल सेवेत काही काळ अडथळा निर्माण झाला.

लोकलमध्ये साप…

मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात साप दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्य रेल्वेच्या लोकल सेवा विस्कळीत झाल्या होत्या. महिलांच्या डब्यात साप असल्याची शंका व्यक्त होताच काही महिला प्रवाशांनी अलार्म चेन पुलिंग केली. त्यामुळे सकाळी 9.14 ते 9.26 या वेळेत लोकल तब्बल 12 मिनिटे थांबवावी लागली.

Mumbai Local मध्ये महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय! महिलांचा डबा ओळखणे होणार सोपे; ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चा प्रस्ताव

ही घटना ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून लोकल सुटल्यानंतर घडली. अलार्म चेन ओढण्यात आल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महिलांच्या डब्याची संपूर्ण तपासणी करण्यात आली. मात्र, तपासणीत कोणताही साप अथवा संशयास्पद बाब आढळून आली नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनी डबा पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर लोकल पुन्हा मार्गस्थ करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः महिलांमध्ये घबराट पसरली होती.

या घटनेचा मध्य रेल्वेच्या काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर किरकोळ परिणाम झाला. दरम्यान, प्रत्यक्षात डब्यात साप होता की ही केवळ अफवा होती, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या घटनेबाबत अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.

जबाबदार कोण? रेल्वे प्रशासन की आपण?

ठाणे स्थानकावरील महिलांच्या डब्यात साप अफवांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरांचा झपाट्याने होणारा विस्तार, जंगलांवरील अतिक्रमण आणि नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास यामुळे वन्यजीव मानवी वस्त्यांकडे वळत असल्याचे चित्र सातत्याने दिसत आहे. त्यामुळे अशा घटना केवळ अपघाती नसून पर्यावरणीय बदलांचे संकेत असल्याची चर्चा होत आहे.

मात्र, यासोबतच रेल्वेच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित होतात. लोकलसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची नियमित तपासणी, स्वच्छता आणि देखभाल ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे साप प्रत्यक्षात डब्यात होता की नाही, याची अधिकृत चौकशी होणे आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स, लोकलला बसला जोरदार धक्का; ट्रेन मॅनेजरच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे वाचले प्राण

Web Title: Mumbai local thane train delayed after snake scare in womens coach central railway news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • central railway
  • Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित
1

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ
2

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला
3

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन
4

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.