Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local Update: लोकलमधील चोरी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी सर्व डब्यांवर सीसीटीव्हीची नजर

लोकल गाड्यांमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असून, शेकडो डब्यांमध्ये ही यंत्रणा आधीच कार्यान्वित झाली आहे. यामुळे गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावी होण्याबरोबरच प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 26, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मध्य रेल्वेच्या लोकल डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मोहीम वेगाने सुरू
  • लोकलमधील चोरी, हाणामाऱ्या आणि गैरवर्तनाच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत
  • आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधणे अधिक सोपे होणार
 

गर्दीच्या लोकलमधील प्रत्येक प्रवास हा आता केवळ वेळेशी स्पर्धा राहिलेला नाही, तर सुरक्षिततेचाही प्रश्न बनला आहे. गेल्या काही महिन्यांत हाणामाऱ्या, चाकूहल्ले, मिरची स्प्रे, महिलांशी गैरवर्तन आणि चोरीच्या वाढत्या घटनांनी उपनगरीय रेल्वेतील सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर लोकलमधील प्रत्येक हालचालीवर डिजिटल नजर ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. एकूण २,१९४ डब्यांपैकी ८८८ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित झाले असून, उर्वरित १,३०६ डब्यांमध्ये कॅमेरे बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण लोकल ताफा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली येणार आहे. लोकलमधील गुन्ह्यांच्या तपासात पुराव्यांचा अभाव ही मोठी अडचण होती. मात्र, सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित झाल्यानंतर गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावी होणार आहे.

आता जनरल डब्यांचीही सुरक्षा होणार बळकट

संपूर्ण उपनगरीय ताफ्यात सीसीटीव्ही बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असून, जनरल डब्यांमध्येही ही सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जात आहे. सध्या १,१८० जनरल डब्यांपैकी ९४ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत, तर उर्वरित डब्यांमध्ये कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच ९६ जनरल डब्यांमध्ये टॉक-बॅंक प्रणाली उपलब्ध असून, उर्वरित डब्यांमध्येही ही सुविधा विस्तारली जाणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधणे अधिक सोपे होणार असून, सुरक्षाव्यवस्थाही अधिक सक्षम होईल.

Video : धावत्या लोकलच्या दारात लटकणाऱ्या महिलेचा थरार; पुलाच्या खांबाला साडी अडकली अन्…, रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

महिला डब्यांमध्ये मिळणार शंभर टक्के सुरक्षा

महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मध्य रेल्वेने महिलांसाठी राखीव सर्व ७९४ -१,०८४ डब्यांमध्ये सीसीटीव्ही आणि टॉक-बॅंक प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळविणे, तसेच घटनांची नोंद घेणे अधिक सुलभ झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबरोबरच लोकलच्या सुरक्षित संचालनावरही मध्य रेल्वेने भर दिला आहे. एकूण ३२० मोटरमन कॅबपैकी ७१ कॅबमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, उर्वरित २५१ कॅबमध्येही टप्प्याटप्प्याने कॅमेरे बसविण्यात येणार आहेत

लोकल डब्यांमधील सीसीटीव्ही प्रकल्प

एकूण डबे २,१९४

सीसीटीव्ही कार्यान्वित ८८८

निविदा प्रक्रियेत १,३०६

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये ८३.६८% साठा! पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, तरी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय अद्याप नाही

जनरल डब्यांची सद्यस्थिती

एकूण डबे -१,१८०

सीसीटीव्ही असलेले ९४

सीसीटीव्ही नसलेले १,०८६

टॉक-बैंक प्रणाली असलेले ९६

टॉक-बैंक प्रणाली नसलेले ९,०८४

महिला डबे

एकूण डबे ७९४

सीसीटीव्ही ७९४

टॉक-बॅंक प्रणाली ७९४

Web Title: Mumbai local update cctv surveillance in local coach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • central railway
  • Local News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

आरोग्य व्यवस्था डिजिटल करण्यावर प्रशासनाचा भर! उपतक्रारी, जन्म-मृत्यू नोंदी आणि खरेदी प्रक्रियेवर असणार डॅशबोर्डची नजर
1

आरोग्य व्यवस्था डिजिटल करण्यावर प्रशासनाचा भर! उपतक्रारी, जन्म-मृत्यू नोंदी आणि खरेदी प्रक्रियेवर असणार डॅशबोर्डची नजर

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
2

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली
3

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ
4

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.