Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालिका रुग्णालयांच्या रक्तपेढ्या खासगीकरणाच्या मार्गावर? वाढत्या दरांच्या भीतीने विरोधक आक्रमक

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील रक्तपेढ्या खासगी संस्थांकडे देण्याच्या प्रस्तावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे गरीब रुग्णांवर आर्थिक भार वाढेल, अशी भीती व्यक्त करत विरोधकांनी प्रशासनावर टीका केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 22, 2026 | 01:49 PM
पालिका रुग्णालयांच्या रक्तपेढ्या खासगीकरणाच्या मार्गावर? वाढत्या दरांच्या भीतीने विरोधक आक्रमक

पालिका रुग्णालयांच्या रक्तपेढ्या खासगीकरणाच्या मार्गावर? वाढत्या दरांच्या भीतीने विरोधक आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • पालिका रुग्णालयांतील रक्तपेढ्या पीपीपी मॉडेलवर देण्याच्या प्रस्तावाला विरोध वाढला आहे.
  • रक्तासाठी भविष्यात अधिक पैसे मोजावे लागू शकतात, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
  • सुधार समितीची बैठक ऐनवेळी रद्द झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील रक्तपेढ्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर खासगी संस्थांना चालवण्यास देण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. या निर्णयाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रस्तावामुळे मुंबईतील गरीब आणि गरजू रुग्णांना भविष्यात रक्तासाठी हजारो रुपये मोजावे लागतील, अशी भीती ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या सुधार समितीसमोर मार्च आणि एप्रिल महिन्यातील प्रलंबित विषयांसह सहा नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी येणार होते. मात्र, बैठकीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी अचानक ही बैठक रद्द करण्यात आली. या अजेंड्यामध्ये भगवती, एम. टी. अग्रवाल आणि राजावाडीसह एकूण पाच प्रमुख पालिका रुग्णालयांतील रक्तपेढ्या खासगी संस्थांकडे सोपवण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव होता. बैठक रद्द झाल्यामुळे हा विषय चर्चेविनाच राहिल्याचा आरोप सचिन पडवळ यांनी केला आहे.

MSRTC Electric Bus : एसटीच्या ई-बस पुरवठ्यात मोठा घोळ? 1,288 बसांचे लक्ष्य अपूर्ण; कंत्राट रद्द करण्याची मागणी

३०० चौरस मीटर जागेचे गुपित काय?

या सपूर्ण प्रस्तावात रक्तपेढ्यासाठी गरजेपेक्षा जास्त जागा खासगी संस्थांच्या पदरात पाडली जात असल्याचा आक्षेप ठाकरे गटाने घेतला आहे. नियमानुसार होल ब्लड बैंकेसाठी साधारण १०० चौरस मीटर जागा पुरेशी असते. असे असताना काही रुग्णालयामध्ये ३०० चौरस मीटरपेक्षा अधिक जागा खासगी संस्थांना का दिली जात आहे? या अतिरिक्त जागेचा भविष्यात व्यावसायिक आणि हॉटेल्ससारखा गैरवापर तर होणार नाही ना ? असा संशय सचिन पडवळ यांनी उपस्थित केला.

ग्रीन झोन आणि मैदानांवरही डल्ला

‘डी वॉर्ड’मधील एका हक्काच्या ‘ग्रीन झोन’चे (हरित क्षेत्र) निवासी क्षेत्रात रूपांतर करण्याचा आणि वांद्रे येथील एका खेळाच्या मैदानाचे आरक्षण रद्द करून ती जागा प्रदर्शनासाठी खुली करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आणला आहे. मुंबईकरांच्या पर्यावरणासाठी हजारो कोटीच्या निधीची घोषणा करायची आणि दुसरीकडे हक्काची मैदाने व हरित पट्टे बिल्डरांच्या घशात घालायचे, हा प्रशासनाचा दुटप्पीपणा असल्याचा घणाघात पडवळ यांनी केला.

MSRTC Electric Bus : एसटीच्या ई-बस पुरवठ्यात मोठा घोळ? 1,288 बसांचे लक्ष्य अपूर्ण; कंत्राट रद्द करण्याची मागणी

रक्ताचे दर गगनाला भिडणार?

सध्या पालिकेच्या रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया किंवा इतर उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना रक्त मोफत अथवा अत्यंत नगण्य शुल्कात उपलब्ध करून दिले जाते. मात्र, हे नियंत्रण खासगी संस्थांकडे गेल्यास साध्या रक्तासाठी ११०० रुपये, तर घटक वेगळे केलेल्या प्रक्रियायुक्त रक्तासाठी १६०० ते १७०० रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. तर थैलेसेमियाग्रस्त रुग्णांना आयुष्यभर नियमित रक्ताची गरज असते, त्यांना हे रक्त मोफत मिळणार की नाही, याबाबत मूळ प्रस्तावात कोणतीही स्पष्टता नसल्याकडे पडवळ यांनी लक्ष वेधले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai municipal hospital blood banks ppp model opposition over privatization proposal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Mumbai News
  • Opposition Leader
  • shivsena
  • udhdhav thakrey

संबंधित बातम्या

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
1

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा
2

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा

‘वारसाहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला
3

‘वारसाहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबईत मॅकडोनाल्डसह ३ ठिकाणांवर FDAची कारवाई; गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न परवाने निलंबित
4

मुंबईत मॅकडोनाल्डसह ३ ठिकाणांवर FDAची कारवाई; गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न परवाने निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.