Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rani Baug Mumbai : राणी बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, 8 दिवसं गप्प का बसलं प्रशासन? संतप्त प्राणीप्रेमींचा सवाल

Mysterious Death Shakti Tiger Byculla Zo : महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात ‘शक्ती’ वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तो दहा वर्षांचा होता.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 26, 2025 | 12:25 PM
राणी बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, 8 दिवसं गप्प का बसलं प्रशासन? संतप्त प्राणीप्रेमींचा सवाल (फोटो सौजन्य-X)

राणी बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, 8 दिवसं गप्प का बसलं प्रशासन? संतप्त प्राणीप्रेमींचा सवाल (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:
  • भायखळ्याच्या राणी बागेत शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू
  • वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील व्यवस्थापनाकडून हेळसांड
  • वाघ मांस खाताना एक हाड श्वसननलिकेत अडकले होते
Mysterious Death Shakti Tiger Byculla Zo News in Martahi: भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहलयाला दररोज पर्यटकांची ये-जा होत असते. विशेषता चिमुकल्यांना हे सर्वात आवडते ठिकाण आहे. अशातच प्राणीसंग्रहालयातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्राणीसंग्रहालयात असलेल्या शक्ती वाघाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.

राणी बागेट वाघाचा गूढ मृत्यू

भायखळा प्राणीसंग्रहालयातील शक्ती वाघ २०२० मध्ये छत्रपती संभाजीनगर प्राणीसंग्रहालयात आणण्यात आला होता. त्यावेळी वाघ साडेतीन वर्षांचा होता आणि आता दहा वर्षांचा होता.या वाघाचा मृत्यू अपस्माराचे झटके आल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आले होता. मात्र तरीही वाघाच्या मृत्यूची माहिती आठ दिवस लपवली असल्याने उद्यान व्यवस्थापनाकडून योग्य ती देखभाल झाली नसल्याने या वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला.

मुंबईतील मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; निवडणूक आयोगाची कबुली

दहा वर्षांचा असलेल्या या वाघाची आता पूर्ण वाढ झालेली होती. या उद्यानात प्रशासनाने नैसर्गिक अधिवास केला होता ज्यात तो राहत होता. या वाघाला खाण्यासाठी मांसाहारही देण्यात येत होते, शिवाय भरपूर पाणी, बसण्यासाठी- विहार करण्यासाठी ठिक-ठिकाणी लहानसे पाणवठेही तयार करण्यात आले होते. शक्ती वाघासोहत दुसरा वाघ जय आणि वाघीण करिश्माही होते. परंतू 17 नोव्हेंबर रोजी शक्ती वाघाला श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर फिट्स आल्याने मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.

श्वसननलिकेत अडकले हाड

हा वाघ मांस खाताना एक हाड श्वसननलिकेत अडकले होते आणि याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रथमेश जगताप यांनी केला आहे. कायद्यानुसार महाराष्ट्र झू अॅथोरिटी, सेंट्रल झू अॅथोरिटीला वाघाच्या मृत्यूबाबत सविस्तर माहिती देणे आवश्यक असताना केवळ ई-मेलने कळवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. वाघाचा मृत्यू जाहीर करण्याआधी उद्यान प्रशासनाने मृत वाघाची विल्हेवाट कशी लावली, वाघाच्या पोस्टमॉर्टमचे रेकार्ंडग करून 24 तास देखरेखीखाली ठेवले का, असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.

८ दिवसांपासून राणी बाग प्रशासन गप्प का?

भायखळ्याच्या राणी बागेत घडलेल्या या प्रकरणानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते प्रथमेश जगताप यांनी ‘शक्ती’ वाघाचा मृत्यू मांस खाल्ल्याने आणि श्वासनलिकेतील अडकल्यामुळे झाला असा दावा केला आहे. इतकेच नाही तर कायद्यानुसार, वाघाच्या मृत्यूबद्दल महाराष्ट्र प्राणीसंग्रहालय प्राधिकरण आणि केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाला सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. मात्र ही माहिती फक्त ई-मेलने कळवण्यात आलेली होती.

Mumbai Terror Attack : आग, धूर आणि रक्ताने माखलेली ती रात्र… ‘या’ देवदूतांमुळे वाचला ताजमध्ये अडकलेल्या लोकांचा जीव

Web Title: Mumbai news suspicious death of shakti tigeat byculla zoo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai News: 200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता
1

Mumbai News: 200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका
2

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू
3

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

Mumbai News: दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा
4

Mumbai News: दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.