26/11 Mumbai Terror Attack : 17 वर्षापूर्वीची ती काळरात्र... आग, धूर आणि रक्ताने भरलेली, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तीन दिवस चाललेल्या या हल्ल्यात १६६ जणांनी प्राण गमावले, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी ताज, ओबेरॉय-ट्रायडेंट, सीएसटी, कामा हॉस्पिटल, लिओपोल्ड कॅफे यांसारख्या गर्दीच्या ठिकांणांना लक्ष्य करत बॉम्बने उडवून दिले होते. सीएस,टी स्थानकावर अंदाधुंद गोळीबारही करण्यात आला होता, ज्यामध्ये ५८ लोक मृत्यूमुखी पडले. दहशतवाद्यांनी गर्दीत घुसून मोठ्या प्रमाणात मुबंईच्या अनेक भागांमध्ये धुमाकूळ माजवला होता.
ताज हॉटेलच्या लॉबी, बार, ट्राडेंट परिसर आणि अनेक रेस्टॉरंटमध्ये गोळीबार करण्यात आला होता. अनेक विदेशी भारतीय नागरिक आणि विदेशी नागरिक ताजच्या आत अडकले होते. मुंबईची लोकप्रिय टिफिन रेस्टॉरंटमध्ये देखील अनेक निरपराध नागरिकांचा बळी या दहशतवाद्यांनी घेतला होता. तसेच वाडी आणि विलेपार्ली येथील टॅक्सींमध्ये देखील बॉम्बस्फोट झाला होता. लोकांवर ग्रेनेड बॉम्ब फेकून मारण्यात आले होते.
दहशतवाद्यांनी ताजमध्ये अडकेलेल्या लोकांना बंद बनवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ताजच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या धैर्याने २०० लोकांचे प्राण वाचले. त्या वेळेचे हेड शेफ हेमंत ओबेरॉय आणि ताज कर्मचाऱ्यांनी लोकांनी आपले जीव धोक्यात घालत लोकांना बाहेर काढले. सुरक्षा दल आणि कमांडोच्या शौर्याने देखील अनेक लोक ओलिस होण्यापासून वाचले होते. सुरक्षा दलांनी हॉटेलमध्ये प्रवेश करत लोकांना ताडीने बाहेर काढले होते.
शिवाय यामध्ये अनेक मुंबई पोलिस अधिकारी देखील जखमी झाले होते. कामा हॉस्पिटलच्या परिसरात हेमंत करकरे, अशोक कामटे, आणि विजय सालस्कर यांनी दहशतवाद्यांना थेट सामेर जात लढा दिला होता. त्या रात्री ज्यू आउटरीच सेंटरवर देखील दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. जिथे एक भायरतीय आयाने जीव धोक्यात घालून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला होता.
या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा तपास आजही सुरुच आहे. आजही अनेक रहस्ये या हल्ल्याबाबत उलघडलेली नाहीत. पण या हल्ल्यामध्ये एक मोठे रहस्ये समोर आले होते. होते. साजिद मीर या दहशतवाद्याची ओळख पटली होती, आणि धक्कादायक म्हणजे पाकिस्तान त्याची १७ वर्षांपासून रक्षा करत आहे. पण पाकिस्तानने हा दावा नाकरला आहे. आज या हलल्याला १७ वर्षे पूर्ण झाली असून या हल्ल्याबद्दल बोलताना, लिहिताना आजही अंगावर काटा येतो.






