Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local Update: मध्य रेल्वेचा वेग मंदावला; गाड्या 10-15 मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

Mumbai Local: मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला असून कामावर जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 08, 2026 | 08:53 AM
Mumbai Local Update: मध्य रेल्वेचा वेग मंदावला; गाड्या 10-15 मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

Mumbai Local Update: मध्य रेल्वेचा वेग मंदावला; गाड्या 10-15 मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली असून अनेक गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.
  • नेरळ-भिवपुरी स्थानकावर रुळांवर पाणी साचल्याने कर्जत-सीएसएमटी मार्गावरील लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
  • पश्चिम रेल्वेवरही पावसाचा परिणाम दिसून येत असून वसई-नालासोपारा दरम्यानची सेवा देखील विलंबाने सुरू आहे.
Mumbai Local Train Updates: मुंबई – ठाण्यासह उपनगर परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता रेल्वे गाड्यांवर देखील होत असल्याते पाहायला मिळत आहे. आज सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज पहाटेपासूनच ठाणे परिसरात हलक्या ते मध्य स्वरुपाचा पाऊस सुरु झाला आहे. सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे आता मध्य रेल्वेचा खोळंबा झाला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरु आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक पुन्हा सुरू; दरड हटवल्यानंतर वाहतुकीला हिरवा कंदील

लोकल गाड्यांची वाहतूक उशीराने

तसेच, नेरळ- भिवपूरी रेल्वे स्थानकावर पाणी साचले आहे. यामुळे कर्जतवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या उशीराने धावत आहेत. तसेच, काही काळासाठी बदलापूर ते कर्जत लोकलसेवा ठप्प झाली होती. बदलापुरवरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक देखील आता उशीराने सुरु असल्याचे सांगितलं जात आहे. यामुळे रेल्वे लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

सखल भागांत पाणी साचले

गेल्या दोन दिवसांपासून कर्जत परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. या परिसरातील सखल भागांत देखील पाणी साचले आहे. तसेच सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नेरळ- भिवपुरी रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळावर देखील पाणी साचलं असल्याचे समोर आलं आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक उशीराने सुरु आहे.

कर्जतवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जतवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प झाली असून 9 ते 10 वाजेपर्यंत सेवा पूर्वपदावर येईल, असे सांगितलं जात आहे. मुंबईवरून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या आता केवळ बदलापूर आणि नेरळपर्यंत चालवल्या जात असल्याचे सांगितलं जात आहे. या गाड्या पुन्हा बदलापूर आणि नेरळवरून मुंबईच्या दिशेने रवाना केल्या जात आहेत. पण या रेल्वे गाड्यांची वाहतूक देखील उशीराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. लोकल गाड्या उशीरा सुरु असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला असून कामावर कसे जायचं, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा हाहाकार! सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात; लोकल ट्रेनची वाहतूक उशिराने, रेड अलर्ट जारी

पश्चिम रेल्वे उशीराने

तसेच, पश्चिम रेल्वेची लोकलसेवा देखील पावसामुळे उशीराने सुरु असल्याचे समोर आले आहे. तसेच, वसई आणि नालासोपारा रेल्वे स्थानकांमधील रुळावर पाणी साचले असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सेवा देखील उशीराने सुरु आहे. मुंबईतील पावसाचा फटका पुन्हा एकदा आता रेल्वे सेवेला बसला असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Mumbai rains disrupt central railway local trains delayed by 10 to 15 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 08:53 AM

Topics:  

  • Mumbai Local
  • Mumbai local train
  • Mumbai Rain

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’
1

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.