Chandrapur News: चंद्रपूरमध्ये महिलांची आर्थिक क्रांती! २.२६ लाख महिलांनी उभारला स्वावलंबनाचा नवा मार्ग
एकूण ४७०९ आदिवासी समूहांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात यश आले आहे. अलीकडेच नाशिक येथे २५ आदिवासी महिलांनी १३ दिवसांचे व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केले असून त्या आता मास्टर प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कर्जपुरवठाही महत्त्वाचा ठरला आहे. आतापर्यंत १३ हजार ६३२ समूहांना सुमारे ३५२.७० कोटी रुपयांचे कर्ज मिळाले असून १.४० लाख कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. विशेष म्हणजे कर्जफेडीचे प्रमाण ९९ टक्के असून बँकांकडून महिलांना आता १० लाखांपर्यंत कर्ज देण्याची तयारी दर्शविण्यात येत आहे.
याशिवाय जिल्ह्यात ४४ हहजार ३०० महिलांचे विविध व्यवसाय सुरू आहेत. ७९६ उत्पादक समूह आणि १० महिला उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या असून त्यांचे कार्यही सुरू झाले आहे. कृषी, पशुपालन व मत्स्य व्यवसायासाठी अनुक्रमे ३४५ कृषी सखी, ३४६ पशुसखी आणि ९७ मत्स्य सखी कार्यरत आहेत. एकूणच, बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी केवळ बचत नव्हे तर आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला असून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आहे.
कलाकारांच्या स्वप्नांना आर्थिक फटका, नियमित उत्पन्नाचा अभाव; शहर सोडून गावी परतण्याची वेळ






