Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News: आष्टीत महापुराचा तडाखा; शेकडो हेक्टर खरीप पिकांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे शेकडो हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून तातडीच्या मदतीची मागणी करत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 05, 2026 | 02:16 PM
Wardha News: आष्टीत महापुराचा तडाखा; शेकडो हेक्टर खरीप पिकांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

Wardha News: आष्टीत महापुराचा तडाखा; शेकडो हेक्टर खरीप पिकांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे आष्टी तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांचे मोठे नुकसान झाले.
  • नुकसान होऊनही अनेक गावांमध्ये महसूल विभागाकडून पंचनामे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
  • दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत, मोफत बियाणे-खते आणि विशेष अनुदान देण्याची शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे.
वर्धा: आष्टी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आणि नदी-नाल्यांना आलेल्या महापुराने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले आहे. या पावसामुळे शेकडो हेक्टर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अजूनपर्यंत महसुल विभागाकडून कुठलेली पंचनामे न झाल्यामुळे शेतक-यांमध्ये चांगलाच संताप व्यक्त होत आहेत.

Raigad News: रोह्यात शेकापची रणनिती ठरली; ग्रामपंचायत निवडणुकांसह स्मार्ट मीटरविरोधी आंदोलनाचा निर्धार

तालुक्यातील वडाळा, साहूर, बोरगाव, माणिकवाडा, तारासावंगा, अंतोरा, खंबीत, बेलोरा, भारसवाडा, खडकी, परसोडा, सिरसोली, चिस्तूर, भीषनूर, आनंदवाडी, राणवाडी, तळेगाव, बंबर्डा, बोरखेडी, थार, किन्ही, मोई, धाडी, पोरगव्हाण, पंचाळा, पिलापूर, लहान आर्वी, जैतापूर, लिंगापूर, जोलवाडी, देलवाडी आणि अंबिकापूर परिसरातील नदी-नाल्यांनी रौद्ररूप धारण केल्याने शेकडो शेतांमधील नव्याने पेरलेली खरीप पिके वाहून गेली असून अनेक शेतांमध्ये अद्यापही पाणी साचून आहे.

२७ व २८ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीतून शेतकरी सावरत नाही तोच १, २, ३ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या संततधार पावसाने उरली सुरली आशाही हिरावून घेतली. सोयाबीन, कापूस, तूरसह विविध खरीप पिके पूर्णपणे खरडून गेली असून अनेक ठिकाणी सुपीक मातीही वाहून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे गंभीर आर्थिक संकट कोसळले आहे. बियाणे आणि खतांसाठी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून किंवा उसनवारी करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा पेरणीसाठी निधी उभारण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. महापुरामुळे कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

पंचनाम्यांची प्रक्रिया कधी?

एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही अनेक गावांमध्ये महसूल विभागाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, तसेच विशेष अनुदान मंजूर करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

Mumbai Rain Update : धडकी भरवणारं दृश्य! मुसळधार पावसात भांडूपमध्ये रस्ता खचला; टेम्पोसह झाड जमिनीच्या पोटात गायब

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

नैसर्गिक आपत्तीने आधीच होरपळलेल्या अन्नदात्याच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा आर्थिक विवंचनेत भर पडून शेतकरी आणखी अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदतकार्याला गती द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Heavy rains devastate kharif crops in wardha farmers demand immediate compensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • wardha

संबंधित बातम्या

नोकरी टिकवण्याचं मोठं आव्हान! Tech कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मोठा दणका, आकडा भयंकर; कपात शर्यतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर
1

नोकरी टिकवण्याचं मोठं आव्हान! Tech कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मोठा दणका, आकडा भयंकर; कपात शर्यतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर

3 कोटींची नोकरी सोडून किराणा दुकान सुरू केलं! IIT गोल्ड मेडलिस्टच्या निर्णयामागचं कारण ऐकून थक्क व्हाल
2

3 कोटींची नोकरी सोडून किराणा दुकान सुरू केलं! IIT गोल्ड मेडलिस्टच्या निर्णयामागचं कारण ऐकून थक्क व्हाल

आता गावागावांत नवे उद्योजक घडणार, MACCIA चा ऐतिहासिक निर्णय! काय आहे हब-अँड-स्पोक मॉडेल?
3

आता गावागावांत नवे उद्योजक घडणार, MACCIA चा ऐतिहासिक निर्णय! काय आहे हब-अँड-स्पोक मॉडेल?

LPG सिलेंडरच्या किमतींवर होणार परिणाम? सरकारने LNG सप्लायवरील बंदी हटवली; जाणून घ्या नेमकं काय बदलणार
4

LPG सिलेंडरच्या किमतींवर होणार परिणाम? सरकारने LNG सप्लायवरील बंदी हटवली; जाणून घ्या नेमकं काय बदलणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.