Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: अरे देवा! नॉनव्हेज खात असाल तर घर मिळणार नाही…; इस्टेट एजंटच्या व्हायरल व्हिडीओने मुंबईत नवा वाद, कारवाईची मागणी

Mumbai News: मुंबईतील ताडदेव परिसरातील घराच्या जाहिरातीचा इस्टेट एजंट भावेश कावरे याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर मिळणार नसल्याचे, तर शाकाहारी व्यक्तींना घरासाठी स्वागत असल्याचे वक्तव्य करण्यात आले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या कथित भेदभावावरून संताप व्यक्त होत...

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 13, 2026 | 02:41 PM
अरे देवा! नॉनव्हेज खात असाल तर घर मिळणार नाही...; इस्टेट एजंटच्या व्हायरल व्हिडीओने मुंबईत नवा वाद, कारवाईची मागणी

अरे देवा! नॉनव्हेज खात असाल तर घर मिळणार नाही...; इस्टेट एजंटच्या व्हायरल व्हिडीओने मुंबईत नवा वाद, कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:
  • ‘मांसाहार करत असाल तर ताडदेवमध्ये घर मिळणार नाही’
  • इस्टेट एजंटचा व्हिडीओ व्हायरल, वाद पेटला
  • भावेश कावरेच्या व्हिडीओवर ठाकरे गट, मनसे आक्रमक
Mumbai News: मुंबईत घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं; मात्र सोशल मीडियावरील इस्टेट एजंटच्या व्हायरल व्हिडीओने मुंबईत नवा वाद सुरु आहे. मुंबईतील ताडदेव परिसरातील फ्लॅटच्या जाहिरातीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. इस्टेट एजंट भावेश कावरे याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना संबंधित घर उपलब्ध होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये ताडदेव येथील ९०० स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेल्या २ बीएचके फ्लॅटची जाहिरात करण्यात आली आहे. या जाहिरातीदरम्यान, “तुम्ही मांसाहार करत असाल तर इथे घर मिळणार नाही, पण व्हेजिटेरियन असाल तर मोस्ट वेलकम,” अशा आशयाचे वक्तव्य करण्यात आले आहे.

मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! २३८ एसी लोकलची निर्मिती आता रेल्वेच्या ३ कारखान्यांत; २०२७ पासून रेक मिळणार

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संबंधित वक्तव्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. घर देताना व्यक्तीच्या आहाराच्या सवयीवरून भेदभाव केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित इस्टेट एजंटसोबतच या फ्लॅटशी संबंधित बिल्डरचीही भूमिका तपासण्याची मागणी केली जात आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर या वक्तव्यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुंबईत घर देताना एखाद्या व्यक्तीच्या खानपानाच्या सवयीवरून भेदभाव करणे योग्य आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ठाकरे गट आक्रमक

या प्रकरणावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत, ब्रोकरही बिल्डरची भाषा बोलत असल्याचा आरोप केला आहे. संबंधित ब्रोकरचा शोध घेऊन त्याचा समाचार घेण्याचा इशाराही त्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

मनसेचीही भूमिका

या व्हिडीओवरून मनसेकडूनही प्रतिक्रिया उमटली आहे. घर खरेदी-विक्री किंवा भाड्याने देताना आहाराच्या सवयीवरून नागरिकांमध्ये भेदभाव करण्याचा प्रकार योग्य आहे का, यावरून आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

‘मुंबईत कोण काय खावं हे ठरवणारे तुम्ही कोण?’

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी मुंबईच्या बहुसांस्कृतिक आणि सर्वसमावेशक स्वरूपाचा दाखला दिला आहे. मुंबई ही मराठी माणसाची, आगरी-कोळी बांधवांची तसेच महाराष्ट्रातील कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची आहे. त्यामुळे मुंबईत कोणत्या व्यक्तीने काय खावे किंवा काय खाऊ नये, हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ही मुंबई मराठी माणसाची आहे. आगरी-कोळी बांधवांची आहे. महाराष्ट्राच्या कष्टकरी, सर्वसामान्य माणसाची आहे.
आणि मुंबईत कोणी काय खावं, काय खाऊ नये हे ठरवणारे तुम्ही कोण?
माणूस मच्छी, मटण किंवा चिकन खातो म्हणून त्याला घर नाकारणं ही फक्त घर देण्याची मनमानी नाही ही उघड सामाजिक भेदभावाची… pic.twitter.com/84k06soddf — Shubham Karpe | शुभम करपे (@ShubhamKarpe10) August 12, 2026

मुंबईत विविध जाती, धर्म, भाषा आणि खाद्यसंस्कृतीचे नागरिक अनेक वर्षांपासून एकत्र राहत आहेत. त्यामुळे घर खरेदी किंवा भाड्याने देताना शाकाहारी-मांसाहारी असा फरक केला जाणे हा केवळ मालमत्तेच्या व्यवहाराचा विषय न राहता सामाजिक भेदभावाचा मुद्दा ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

वादाचा मुख्य मुद्दा काय?

या प्रकरणात केवळ एका फ्लॅटच्या जाहिरातीचा प्रश्न नसून, मुंबईसारख्या महानगरात घर मिळवताना व्यक्तीच्या खानपानाच्या सवयी, धर्म किंवा सामाजिक ओळखीच्या आधारे भेदभाव केला जातो का, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी अशा प्रकारच्या जाहिरातींवर आक्षेप घेत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Mumbai News: सिटी पार्कच्या वापराबाबत पुन्हा वाद! नागरिकांसाठीच्या उद्यानाचा बांधकाम साहित्य साठवणुकीसाठी केला जातोय वापर

Web Title: Mumbai tardeo vegetarian only flat viral video estate agent bhavesh kaware controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • property

संबंधित बातम्या

NCP Mumbai President: पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?
1

NCP Mumbai President: पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?

पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी
2

पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी

Mira Bhayandar महापालिकेच्या नामकरण प्रस्तावांना मराठी एकीकरण समितीचा विरोध; दोन नावांवर आक्षेप
3

Mira Bhayandar महापालिकेच्या नामकरण प्रस्तावांना मराठी एकीकरण समितीचा विरोध; दोन नावांवर आक्षेप

Mumbai News: सिटी पार्कच्या वापराबाबत पुन्हा वाद! नागरिकांसाठीच्या उद्यानाचा बांधकाम साहित्य साठवणुकीसाठी केला जातोय वापर
4

Mumbai News: सिटी पार्कच्या वापराबाबत पुन्हा वाद! नागरिकांसाठीच्या उद्यानाचा बांधकाम साहित्य साठवणुकीसाठी केला जातोय वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.