(फोटो सौजन्य: Pinterest)
एसीसोबत नॉन-एसी लोकलही सुरू राहणार
सर्व लोकल एसी करण्याचा सध्या कोणताही स्वतंत्र निर्णय झालेला नाही. सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेकडे २८५ रेक असून, त्यापैकी २३ एसी आणि २६२ नॉन-एसी रेक आहेत. नवीन २३८ एसी रेक ताफ्यात दाखल झाल्यानंतर नॉन-एसी रेक तातडीने सेवेतून हटविले जाणार नाहीत. त्यामुळे एसी आणि नॉन-एसी अशा दोन्ही प्रकारच्या लोकल सेवा सुरू राहणार असल्याचे वाडेकर यांनी म्हटले आहे.
३ कारखान्यांत रेकची होतोय समांतर बांधणी
मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी २३८ अतिरिक्त एसी रेकला यापूर्वी मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी खासगी कंत्राटदारामार्फत रेकची बांधणी करण्याची निविदा काढण्यात आली होती, मात्र, निविदा प्रक्रियेतून रेक उपलब्ध होण्यास लागणारा कालावधी लक्षात घेता अपेक्षित वेळेत रेक उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खासगी निविदा रद्द करून आयसीएफ, चेन्नई: आरसीएफ, कपूरथळा आणि एमसीएफ, रायबरेली या तीन कारखान्यांमध्ये एकाच वेळी रेकची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पादन क्षमता तीन ठिकाणी विभागल्यामुळे रेक टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले आहे.
पायाभूत सुविधा, रेकची सांगड
पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा, बोरीवली-विरार, कल्याण-बदलापूर, कल्याण-कसारा, बदलापूर-कर्जत आणि आसनगाव-कसारा या मार्गावरील कामांचा त्यात समावेश आहे. १५ फलाटांची लांबी डब्याच्या लोकलसाठी वाढविण्याची कामेही सुरू आहेत. पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण होत असताना त्यासाठी रेक उपलब्ध असणे महत्वाचे आहे.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास एस म्हणाले, “6 खासगी कंत्राटदारासाठी काढलेली निविदा रद्द करून भारतीय रेल्वेच्या तीन उत्पादन कारखान्यांमध्ये २३८ एसी रेकची समांतर बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे २०२७पासून रेक उपलब्ध होण्यास सुरुवात होऊन २०३० पर्यंत संपूर्ण ताफा उपलब्ध होईल. पायाभूत सुविधा आणि रेकची उपलब्धता यांचा ताळमेळ साधून प्रवाशांना त्याचा लाभ लवकर मिळवून देणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे”.
मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव – मुंबईची लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मुंबईसाठी २३८ वातानुकूलित लोकलला भारत सरकारने मंजुरी दिली आहे. या लोकलच्या खरेदीसाठी यापूर्वी अवलंबिलेल्या प्रक्रियेत अनेक अडचणी येत होत्या आणि अपेक्षित वेळापत्रकही मान्य नव्हते. त्यामुळे आता नवीन निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वेच्या आयसीएफ, आरसीएफ आणि एमसीएफ या तीन उत्पादन कारखान्यांमध्ये या वातानुकूलित लोकलची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे २०२७ पर्यंत पहिली वातानुकूलित लोकल उपलब्ध होऊ शकेल.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)





