सिनेटचा पहिला निकाल हाती, युवासेनेच्या उमेदवाराचा विजय (फोटो सौजन्य-X)
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज (27 सप्टेंबर) जाहीर होणार आहे. सकाळी ९ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या टप्प्यात, वैध आणि अवैध मतांची विभागणी करून विजयी कोटा निश्चित केला जाईल. त्यानंतर पुढील मतमोजणीला सुरुवात होईल. मुंबईच्या राजकीय वर्तुळात वर्चस्व राखण्यासाठी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेच्या ७ उमेदवारांचा विजय झाला आहे. दरम्यान, अजून मतमोजणी सुरु असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल.
गेल्या अनेक वर्षांपासून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेचे सिनेट निवडणुकीत वर्चस्व आहे. मात्र, यावेळी भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) सिनेट निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आदित्य ठाकरेंची युवासेना 2018 च्या प्रचाराची पुनरावृत्ती करणार की ABVP सिनेट निवडणूक लढवणार, याबाबतचा निर्णय आज होणार आहे. मुंबई विद्यापीठ फोर्ट येथे सकाळी ९ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 10 जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत 28 उमेदवार रिंगणात होते.
दरम्यान या सिनेटचा पहिला निकाल हाती आला असून युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 5350 मते मिळाली. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. विद्यापीठात 10 जागांसाठी सिनेट निवडणूक झाली. ज्यामध्ये शिवसेना (UBT) आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या स्थितीली आव्हान देता हे.
यातील पहिलाच निकाल नुकताच समोर आला असून यात युवासेनेचा उमेदवार विजयी झाले आहेत. ओबीसी प्रवर्गातील उमेदवार विजयी झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. 22 सप्टेंबर रोजी मतदान झाले आणि न्यायालयाच्या आदेशामुळे मतदानास विलंब झाला. या जागांसाठी रिंगणात असलेले प्राथमिक उमेदवार म्हणजे आदित्य ठाकरे यांचा नेतृत्वाखाली असलेली युवा सेना आणि भाजपची विद्यार्थी शाखा – ABVP – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. मतदानाच्या दिवशी एकूण ५५ टक्के मतदान झाले.
7,200 पैकी 6,684 मतपत्रिका वैध
ओबीसी प्रवर्गातून युवासेना उमेदवाराचा विजय
उवासेना उमेदवार मयूर पांचाळ विजयी
सिनेट निवडणुकीत युवसेनेच्या दुसर्या उमेदवाराचा विजय
शीतल देवरुखकर शेठ एससी प्रवर्गातून झाल्या विजयी
सिनेट निवडणुकीतील 3 जागांवर युवसेनेचे उमेदवार विजयी
युवसेनेचे तिसरे उमेदवार डॉ. धनराज कोहचाडे विजयी