मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून मराठी नामफलकाचा विषय चर्चेत आहे. आता या चर्चेत आणखी नाव आलंय ते म्हणजे महाविद्यालयांच्या नामफलकाचा. आता मुंबई विद्यापीठ (Mumbai University) आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांचे नामफलक मराठीत (Marathi Language) करा, अशी मागणी युवासेनेने(Yuvasena) विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेमध्ये युवासेनेनं स्थगन प्रस्ताव मांडून ही मागणी केली आहे.
एकिकडे महाविद्यालयीन शिक्षणात होत असलेली मराठी भाषेची गळचेपी तर दुसरीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतची केंद्र सरकारची चाललेली चालढकल, यात अडकून पडलेल्या माय मराठीचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार होण्यासाठी विद्यापिठाच्या अधिसभेमध्ये युवा सेनेकडून स्थगन प्रस्ताव मांडून काही महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. युवासेना सिनेट सदस्य शीतल देवरुखकर शेठ यांनी हा स्थगन प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे, मुंबई विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणारी महाविद्यालयातील नामफलक तसेच इतर सूचनाफलक हे दुकानांच्या पाट्या प्रमाणे मराठीत असावे ही प्रमुख मागणी आहे.
त्यासंदर्भात आज विद्यापीठ प्रशासनाला युवासेना सिनेट सदस्य करून निवेदन देण्यात येणार असून या संदर्भात तातडीने परिपत्रक काढून महाविद्यालयांची नाम फलक मराठीत करण्यात यावेत, अशा प्रकारचा आग्रह केला जाणार असल्याचं, युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितलं आहे.
[read_also content=”जनाब राऊत तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहता, पण शेतकऱ्यांविषयी कधी चार ओळी का लिहल्या नाही? आजच्या सामना लेखावरुन गोपीचंद पडळकरांची राऊतांवर घणाघाती टिका https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/mr-raut-you-write-articles-about-y-security-but-why-dont-you-ever-write-four-lines-about-farmers-gopichand-padalkars-harsh-criticism-on-raut-from-todays-match-article-258164.html”]