Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitesh Rane On Abhijeet Dipke : ‘शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही’; अभिजीत दिपकेंच्या आंदोलनावर नितेश राणेंचा घणाघात

Nitesh Rane On Abhijeet Dipke : कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईतील आंदोलनावरून मंत्री नितेश राणे यांनी अभिजीत दिपकेंवर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अपमान करणारा फोटो पोस्ट केल्याचा आरोप करत राणेंनी दिपकेंनी माफी मागावी, अशी मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Oct 01, 2026 | 08:52 PM
Nitesh Rane On Abhijeet dipke

Nitesh Rane On Abhijeet dipke

Follow Us
Follow Us:
  • CJPच्या आंदोलनावरून नितेश राणे आक्रमक.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अपमान केल्याचा दिपकेंवर आरोप.
  • ‘अभिजीत दिपकेंनी माफी मागावी’, नितेश राणेंची मागणी
 

Nitesh Rane On Abhijeet Dipke : कॉक्रोच जनता पार्टीच्या उद्या (शुक्रवार, 2 ऑकटोबर) मुंबईत होणाऱ्या आंदोलनावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या आंदोलनावरून महायुतीतील नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत असून आता भाजप नेते नितेश राणे यांनी सुद्धा यात भर टाकली आहे.

नितेश राणे यांनी CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर जोरदार टीका करत, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करत दिपकेंनी माफी मागावी, अशी मागणी राणेंनी केली.

CJPकडून 2 ऑक्टोबरला मुंबईत आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाची प्रमुख मागणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आहे. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्दे आणि SIRवरही CJPकडून आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान, शिवाजी पार्कमधील प्रस्तावित आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती यापूर्वीच समोर आली आहे. त्यानंतर अभिजीत दिपकेंनी ‘जेल भरो आंदोलन’ करण्याची घोषणा केली होती.

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक

नेमकं काय म्हणाले नितेश राणे?

याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी दिपकेंवर निशाणा साधला. “अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला आपला आक्षेप नाही, मात्र ते ज्या व्यक्तींना समर्थन देतात आणि आंदोलनाच्या प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या काही प्रतिमांवर आपली हरकत आहे, ” असं राणेंनी म्हटलं.

दिपकेंनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोचा संदर्भ देत राणेंनी त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या खाली मावळ्यांच्या ऐवजी ‘क्रॉक्रोज’ दाखवण्यात आल्याचा दावा केला. हा महाराजांचा अपमान असल्याचं म्हणत ‘मुंबईतील कुठलाही शिवप्रेमी आणि देशभक्त हा अपमान सहन करणार नाही,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.

दुसऱ्या फोटोचा संदर्भ देतही राणेंनी आक्षेप घेतला. या प्रतिमेत महात्मा गांधींच्या पायाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दाखवल्याचा त्यांनी दावा केला. या प्रतिमांबाबत अभिजीत दिपकेंनी स्पष्टीकरण द्यावं आणि माफी मागावी, अशी मागणी राणेंनी केली.

‘आंदोलन नेमकं कुणासाठी?’ राणेंचा सवाल

दरम्यान, उमर खालिद यांच्या समर्थनाच्या मुद्द्यावरूनही नितेश राणेंनी दिपकेंना लक्ष्य केलं. ‘हे आंदोलन नेमकं कुणासाठी आहे?’ असा सवाल करत त्यांनी आंदोलनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

‘महाराष्ट्रात लोकशाही आहे, कुणीही घाबरत नाही. आंदोलन करायचं असेल तर करा; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही,’ अशी भूमिका राणेंनी मांडली.

CJP कडून मात्र हे आंदोलन निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आंदोलनाच्या आधीच राणेंनी केलेल्या वक्तव्यांनुसार शिवाजी महाराजांच्या कथित अवमानावरून नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्हं आहेत.

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Web Title: Nitesh rane on abhijeet dipke cjp protest shivaji maharaj shivaji park vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 08:52 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • CJP Protest
  • Mumbai News
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis: आदिवासी विकासासाठी २५ हजार कोटींची तरतूद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

CM Devendra Fadnavis: आदिवासी विकासासाठी २५ हजार कोटींची तरतूद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक
2

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार
3

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
4

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.