Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panvel-Karjat Local : अवघ्या 30 मिनिटांत पनवेल- कर्जत लोकल प्रवास शक्य, कसं ते जाणून घ्या…

पनवेल- कर्जत रेल्वे मार्ग 2026 पर्यंत संपूर्ण प्रकल्प सुरु होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे विकास महामंडळाकडून या कामाची गती वाढवण्यात आली असून प्रवाशांसाठी ही मोठी दिलासा दायक बातमी ठरत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 26, 2025 | 03:18 PM
अवघ्या 30 मिनिटांत पनवेल- कर्जत लोकल प्रवास शक्य, कसं ते जाणून घ्या... (फोटो सौजन्य-X)

अवघ्या 30 मिनिटांत पनवेल- कर्जत लोकल प्रवास शक्य, कसं ते जाणून घ्या... (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • पनवेल ते कर्जत प्रवासाचा वेळ अवघ्या ३० मिनिटांवर
  • पाच स्थानकांवर थेट रेल्वे सेवा मिळणार
  • तीन बोगद्यांचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे.
प्रशांत शेडगे। मुंबई: पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉरचे काम खूपच वेगाने सुरू आहे. या कॉरिडॉरचे काम ८५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. हा प्रोजेक्ट मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पनवेल कर्जत कॉरिडोर तयार करण्यासाठी सुमारे २,७८२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही चौथी मार्गिका तयार झाल्यावर, पनवेल ते कर्जत प्रवासाचा वेळ अवघ्या ३० मिनिटांवर येणार आहे. प्रकल्प तयार झाल्यानंतर पनवेल, मोहोपे, चिखले चौक आणि कर्जत या पाच स्थानकांवर थेट रेल्वे सेवा मिळणार आहे. सध्या प्रकल्पाचे पायाभूत काम जवळपास पूर्ण झाले असून, तीन बोगद्यांचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे.

ट्रॅकची बॅलास्टिंग, टॅपिंग कामे पूर्ण फ्लायओव्हरवरील गर्डर लाँच केले गेले आहेत आणि मोहपे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम यशस्वीरित्या पार पडले आहे. तसेच ट्रॅक आणि ओव्हरहेड इलेट्रिक (ओएचई) काम पूर्ण करण्यासाठी एमआरव्हीसीने बेलापूर-पनवेलदरम्यान मेगाब्लॉक घेतला होता, ज्यामध्ये टॅकची बॅलास्टिंग आणि टॅपिंग कामे पूर्ण झाली असून लवकरच कर्जत – पनवेल लोकल ट्रेन प्रवाशांच्या भेटीला येणार आहे.

Mumbai News : मुंबईत ९० हजार भटके श्वान, शल्टर मात्र केवळ आठ; निवासस्थानांसाठी पायाभूत सुविधांचा अभाव

बोगद्यात बसवल्या संरक्षक जाळ्या

कर्जत व पनवेल शहरांचा भविष्यात होणारा विकास लक्षात घेऊन सात-आठ वर्षांपूर्वी मध्य रेल्वेने कर्जत – पनवेल रेल्वेमार्ग उभारला, हा एकेरी मार्ग केल्याने, शिवाय दीड किमी लांबीचा बोगदा असल्याने या बोगद्यातील ठिसूळ दगड वारंवार कोसळत होता. कोकण रेल्वेच्या धर्तीवर वा बोगद्यात संरक्षक जाळ्या बसवल्यानंतर दरड पडणे थांबल्याने आता तरी या मार्गादर शटल अथया लोकल ट्रेन सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली असून प्रवाशांनी पत्राद्वारे तशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. प्रथम या मार्गावर मालगाड्या सुरू केल्या. त्यातून मध्य रेल्वेला वार्षिक १२ लाख रुपये उत्पन्न मिळू लागले.

कर्जत-खालापूरच्या तरुणांना रोजगार संधी

या मार्गावर हळुहळू जालद गाऊया धावू लागल्या. आता कर्जत पनवेल लोकल सेवा सुरू होईल, अशी अपेक्षा पनवेल आणि कर्जतवासीयांना होती. पनवेल-कर्जत शटल सेवेमुळे कर्जत-खालापूरमधील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होतील, पनवेलमधील प्रस्तावित विमानतळ आणि नवी मुंबईतील रोजगार संधीचा फायदा त्यांना मिळेल, महामुंबईतील प्रवाशांना नव्या रेल्वे मार्गाचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी पनवेल-कर्जत नवीन उपनरीय मागांचे काम सुरू आहे. या मार्गामुळे मुंबईतून पनवेलमार्गे कर्जतला जाण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

प्राथमिक वेळापत्रक देखील तयार

पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे मार्ग हा मुंबई-पुणे जुना महामार्गाजवळून जातो, त्यामुळे येथे रोड ओव्हर पुलांचे काम सुरू आहे. महत्वाचे म्हणजे पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरवरून लोकल ट्रेन चालवण्यासाठी प्राथमिक वेळापत्रक देखील तयार करण्यात आले आहे. या मार्गासाठी १२ डब्यांच्या ३ लोकल गाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत, या गाड्या दिवसभर धावणार आहेत. हा नवीन मार्ग दोन जुन्या स्थानकांना जोडण्यात येणार आहे जयामध्ये उपनगरातील सर्वात मोठा बोगदा आणि पुलाचा देखील समावेश आहे, याआधी या मार्गावर मालगाड्या आणि काही लांब पल्ल्याच्या गाड्या धावत होत्या, पण आता नव्या दुहेरी मार्गिकेमुळे पनवेलमार्गे कर्जतपर्यंत लोकल ट्रेन धावू शकणार आहेत. त्यामुळे कर्जत, पनवेल भागामध्ये राहणा-यांचा प्रवास सोपा आणि सुसाट होणार आहे.

२,७८३ कोटींचा निधी मंजूर

सध्या कर्जत ते सीएसएमटीला धिम्या लोकलने येण्यासाठी २ तास १९ मिनिटे लागतात. हा मार्ग कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल असा जोडला गेल्याने हा लोकल प्रवास १ तास ५० मिनिटांचा होणार आहे. या प्रोजेक्टसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला २.७८३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पाव ते सहा महिन्यात पूर्ण करण्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने उद्दिष्ट आहे.

 मामा-मामीनेच चिमुकलीला विकलं; दुप्पट रकमेवर पुढे विक्री, 48 तासांत पोलिसांनी केली सुटका

Web Title: Panvel karjat railway route update major development announced check full details of stations and project progress latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Karjat
  • Mumbai Local
  • panvel

संबंधित बातम्या

मुंबई लोकलचा होणार कायापालट! मध्य रेल्वेवर गर्दीच्या वेळी १० ते १२ लोकल फेऱ्यांची वाढ, हार्बर मार्गावरही एसी लोकल धावणार
1

मुंबई लोकलचा होणार कायापालट! मध्य रेल्वेवर गर्दीच्या वेळी १० ते १२ लोकल फेऱ्यांची वाढ, हार्बर मार्गावरही एसी लोकल धावणार

Mumbai Fire : धारावीत रेल्वे रुळाला लागून भीषण आग, माहिम- वांद्रे स्थानकाजवळ लोकल विस्कळीत
2

Mumbai Fire : धारावीत रेल्वे रुळाला लागून भीषण आग, माहिम- वांद्रे स्थानकाजवळ लोकल विस्कळीत

Mumbai Local Block: प्रवाशांनो लक्ष द्या! लोकल रद्द, एक्स्प्रेसवरही परिणाम; मध्य रेल्वेवर आजपासून 12 दिवस ब्लॉक
3

Mumbai Local Block: प्रवाशांनो लक्ष द्या! लोकल रद्द, एक्स्प्रेसवरही परिणाम; मध्य रेल्वेवर आजपासून 12 दिवस ब्लॉक

Kalyan Crime: हिंदी भाषेने घेतला अल्पवयीन विद्यार्थ्याचा जीव! लोकलमध्ये धक्का लागला अन् ‘हिंदी-मराठी’ वरून पेटला वाद
4

Kalyan Crime: हिंदी भाषेने घेतला अल्पवयीन विद्यार्थ्याचा जीव! लोकलमध्ये धक्का लागला अन् ‘हिंदी-मराठी’ वरून पेटला वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.