Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारताला जागतिक महाशक्ती बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले’; मुख्यमंत्र्यांचं गौरोद्गार

देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि.२६) पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीची १२ वर्षे पूर्ण केली आहेत. मोदीजींच्या यशस्वी, दूरदर्शी आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेचे एक तप हे भारतासाठी आणि समस्त भारतीयांसाठी वरदान ठरले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 27, 2026 | 11:31 AM
'भारताला जागतिक महाशक्ती बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले'; मुख्यमंत्र्यांचं गौरोद्गार

'भारताला जागतिक महाशक्ती बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले'; मुख्यमंत्र्यांचं गौरोद्गार

Follow Us
Follow Us:

मुंबई : देशाचा स्वाभिमान जागा करून परिवर्तन घडवलं जाऊ शकते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याने दाखवून दिले आहे. फक्त अनुदान घेणे ही वृत्ती न बाळगता देशाला जगामध्ये स्वाभिमानाने उभा असलेला भारत देश बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एवढेच नाही तर देशात ‘मेक इन इंडिया’ ही चळवळ राबवून ‘मेक फॉर वर्ल्ड’च्या दिशेने देशाची वाटचाल सुरू करण्यामागे मोलाचे योगदान दिले आहे. ज्या भारताकडे पूर्वी एक याचक राष्ट्र म्हणून पाहिले जायचे, त्याला जागतिक महाशक्ती बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काढले.

देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि.२६) पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीची १२ वर्षे पूर्ण केली आहेत. मोदीजींच्या यशस्वी, दूरदर्शी आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेचे एक तप हे भारतासाठी आणि समस्त भारतीयांसाठी वरदान ठरले आहे. या ऐतिहासिक पर्वानिमित्त ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Mumbai News : नायरमध्ये बायोकेमिस्ट्री ब्लड ॲनालायझर! सीएसआर निधीतून सहाय्य; अत्याधुनिक व दर्जेदार सेवा मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी मागील 12 वर्षांत केलेले कार्य खूप मोठे आहे. एका पुस्तकात ते कार्य मांडणे खूप कठीण काम आहे. देशातील तळागाळातील शेवटच्या माणसाला सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी मोदींजींनी सतत प्रयत्न केले. हर घर शौचालय, उज्वला गॅस योजना यांसारख्या योजना त्यांनी राबवल्या. सरकारच्या अनुदानावर जनतेला न ठेवता गरीब केंद्रित अजेंडा त्यांनी राबवला. त्याचाच परिणाम म्हणून मागील 10 वर्षांत 25 कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढण्यात सरकारला यश आले.

भारताच्या जीडीपीतही वाढ

भारताचा GDP 2013-14 मध्ये 103 लाख कोटी होता तो 2025-26 मध्ये 357 लाख कोटींपर्यंत म्हणजेच तिप्पट वाढवला. महाराष्ट्राचा GDP 2013-14 मध्ये 13 लाख कोटी इतका होता तो 2025-26 पर्यंत 54 लाख कोटी इतका वाढवला. हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. पंतप्रधान मोदींजींचे 12 वर्षांत केलेला देशाचा विकास हा फक्त घोषणांनी झालेला नाही, तर त्यामागे त्यांची विकासाभिमुख नियोजनबद्ध रणनीती हे मुख्य कारण आहे.

पंतप्रधान मोदींनी नव्या राष्ट्रशक्तीचा केला आदर्श उभा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत भारताने केवळ विकास केला नाही, तर जगासमोर एका नव्या राष्ट्रशक्तीचा आदर्श उभा केला आहे. आजचा भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणारा, डिजिटल तंत्रज्ञानाने सक्षम झालेला, उद्योगशील आणि नारीशक्तीला केंद्रस्थानी ठेवणारा समर्थ राष्ट्र म्हणून जगभरात ओळखला जात आहे, असे गौरवोद्गार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती”या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात काढले.

“राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती” म्हणजे खरंतर देशाच्या जनतेने अनुभवलेला परिवर्तनाचा इतिहास आहे, असे सांगत रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले की, गेल्या एका तपामध्ये सामान्य माणसाच्या आयुष्यात घडलेला बदल प्रत्येक भारतीयाने अनुभवला आहे. शेतकरी, कामगार, गरीब, वंचित आणि उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी व्यवस्था मोदी सरकारने निर्माण केली.

Web Title: Pm narendra modi has accomplished the task of transforming india into a global superpower says cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Political News
  • PM Narendra Modi
  • political news

संबंधित बातम्या

India-Qatar ties : कतारचे ‘राष्ट्रपिता’ शेख हमद अल थानी यांचे निधन; भारताने का जाहीर केला राष्ट्रीय शोक? जाणून घ्या नियम
1

India-Qatar ties : कतारचे ‘राष्ट्रपिता’ शेख हमद अल थानी यांचे निधन; भारताने का जाहीर केला राष्ट्रीय शोक? जाणून घ्या नियम

सूनेच्या तक्रारीनंतर विनायक राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, ‘5 कोटी, 3BHK फ्लॅट, इलेक्ट्रिक कारची मागणी’; सूनेच्या आरोपांवर पलटवार
2

सूनेच्या तक्रारीनंतर विनायक राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, ‘5 कोटी, 3BHK फ्लॅट, इलेक्ट्रिक कारची मागणी’; सूनेच्या आरोपांवर पलटवार

‘पतीचा शारीरिक संबंधास नकार, मासिक पाळीबाबत विचारायचा अन्…’; माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेचे गंभीर आरोप
3

‘पतीचा शारीरिक संबंधास नकार, मासिक पाळीबाबत विचारायचा अन्…’; माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेचे गंभीर आरोप

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा
4

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.