मुंबई : राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिलेल्या विधानपरिषदेतील १०जागा रिक्त होत आहेत. त्यामध्ये राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई,विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांसह विधानपरिषदेतील १० आमदारांची मुदत येत्या ७ जुलै २०२२ रोजी संपत आहे. तर ठाणे स्थानिक प्राधिकरण संस्थामधून विधानपरिषदेवर गेलेले शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांची मुदत येत्या ८ जून रोजी संपत आहे. सध्याच्या महाविकास आघाडीच्या संख्याबळाचा विचार करता भाजपकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे(Possibility of increasing the number of Mahavikas Aghadi in the Legislative Council; Ten will retire, including Speaker and Leader of Opposition!).
विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिलेल्या विधानपरिषदेतील १० आमदारांची मुदत येत्या ७ जुलै २०२२ रोजी संपत आहे.त्यामध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर,राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते दिवाकर रावते,भाजपचे आमदार प्रसाद लाड, सुरजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, सदाशिव खोत, राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांचा समावेश आहे. भाजपचे आमदार रामनिवास सत्यनारायण सिंह यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त असून,त्यांचीही मुदत येत्या ७ जुलै रोजी संपत आहे. ठाणे स्थानिक प्राधिकरण संस्थामधून विधानपरिषदेवर गेलेले शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांची मुदत येत्या ८ जून रोजी संपत आहे.
सध्या विधानसभेत महाविकास आघाडीचे १७५ संख्याबळ आहे त्यात शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस ४३ (कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त) तर भाजप १०६, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, एम.आय.एम.२, प्रहार जनशक्ती२, मनसे१, क्रांतिकारी शेतकरी पक्ष-१ जनसुराज्य शक्ती पक्ष-१, शेकाप-१, राष्ट्रीय समाज पक्ष-१ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया (मार्क्सवादी) १,अपक्ष १३ असे संख्याबळ आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून,बहुमतावेळी या सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीला विधानपरिषदेवर ५ जणांना पाठविण्याची संधी मिळू शकते. काही अपक्ष आमदार आणि अन्य पक्षाच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सहावी जागा जिंकू शकते. विधानपरिषदेतील रिक्त होणा-या एकूण जागापैकी भाजपच्या वाट्याच्या ६ जागा रिक्त होत आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ आमदार निवृत्त होत आहे.
भाजपचे सख्याबळ पाहता आणि त्यांना अपक्ष आणि छोट्या पक्षांची साथ मिळाल्यास भाजपचे ४ आमदार विधानपरिषदेवर जावू शकतात. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची विधानपरिषदेतील कामगिरी पाहता त्यांना दुस-यांदा संधी दिली जावू शकते.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार अशी ओळख असलेले प्रसाद लाड यांच्याही नावाचा विचार होवू शकतो. काही अपक्ष आणि इतर पक्षांनी भाजपला साथ दिली असल्याने हे पक्ष भाजपकडे जागांची मागणी करण्याची शक्यता असल्याने विधानपरिषदेची उमेदवारी देताना भाजपच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
शिवसेनेकडून विद्यमान आमदार सुभाष देसाई यांना संधी दिली जावू शकते. तसेच अभिनेते आणि शिवसेना उपनेते आदेश बांदेकर यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे.विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित विधानपरिषदेतील १० आमदारांची मुदत येत्या ७ जुलैला तर ठाणे स्थानिक प्राधिकरण संस्थामधून विधानपरिषदेवर गेलेले शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांची मुदत येत्या ८ जून रोजी संपत असल्याने या निवडणुका जून मध्ये होण्याची शक्यता आहे.
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]