फोटो सौजन्य - AsianCricketCouncil
Asia Cup 2025 Update : टीम इंडिया सुरु होणाऱ्या आशिया कपसाठी सध्या नेटमध्ये घाम गाळत आहे, बीसीसीआयने भारतीय खेळडूंचे अनेक फोटो शेअ केले होते. यामध्ये आता भारताचा संघ कोणत्या खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आशिया कप २०२५ ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे, या स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी भारतीय क्रिकेट पंडित प्लेइंग इलेव्हनबद्दल बरीच चर्चा करत आहेत. या भागात, टीम इंडियाचा माजी अष्टपैलू आणि सध्याचा तज्ज्ञ इरफान पठाणने आशिया कप २०२५ साठी भारतीय प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे.
शुभमन गिलमुळे त्याने अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची यशस्वी जोडी निश्चितच तोडली आहे, परंतु त्याने सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले नाही. त्याच वेळी, पठाण, नंबर-८ साठी शिवम दुबे आणि कुलदीप यादवबद्दल गोंधळलेला दिसत होता, तो म्हणाला की खेळपट्टी पाहूनच ठरवले जाईल की या दोघांपैकी कोणाला संधी मिळावी.
इरफान पठाणने त्याच्या यूट्यूब चॅनलवर भारतीय संघाची निवड करताना अभिषेक शर्माचा सलामीचा साथीदार म्हणून शुभमन गिलची निवड केली. पठाण म्हणाले की, विराट कोहलीने गेल्या अनेक वर्षांपासून भारतासाठी जे काम केले आहे त्याची पुनरावृत्ती गिल करू शकतो.
तो म्हणाला, “महान विराट कोहली अनेक वर्षांपासून जे काम करत आहे ते शुभमन गिल करू शकतो. विराट कोहलीने त्याच्या स्वतःच्या शैलीत क्रिकेट खेळले आहे. त्याने लांब डाव खेळण्याचा प्रयत्न केला आणि टी-२० क्रिकेटमध्ये स्वतःचा मार्ग तयार केला. जर तुम्ही षटकार मारणाऱ्या फलंदाजांबद्दल बोललात तर तो विराट कोहली आहे, ख्रिस गेल नाही, पण जर तुम्ही त्याचे महत्त्व पाहिले तर टी-२० मध्ये त्याचे खूप महत्त्व होते. मी शुभमन गिलला त्याच प्रकारचा खेळाडू मानतो.”
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर त्याने मुंबईतील दोन खेळाडू निवडले, त्यापैकी एक कर्णधार देखील आहे. इरफान पठाणच्या सांगितल्यानुसार, भारताच्या संघाने तिलक वर्मा यांलाच पुढे चालू ठेवावे तो तिसऱ्या क्रमांकावर उत्कृष्ट कामगिरी करत आहे, तर सूर्या चौथ्या क्रमांकावर यावे. बहुतेक तज्ञ संजू सॅमसनला सलामीच्या जागेवरून बाहेर काढल्यानंतर संघातून वगळत असताना, पठाणने त्याला पाचव्या क्रमांकावर खेळण्याचा सल्ला दिला आहे.
Irfan Pathan has named his strongest India XI for the upcoming Asia Cup 2025 in UAE.
Who’s the surprise pick for you? pic.twitter.com/AfqNwq7ZzS
— CricTracker (@Cricketracker) September 6, 2025
पठाणच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर आणि अक्षर पटेल सातव्या क्रमांकावर आहे. आठव्या क्रमांकावर त्याने शिवम दुबे किंवा कुलदीप यादवला स्थान दिले आहे. तो म्हणतो की दुबे किंवा कुलदीप खेळतील की नाही हे खेळपट्टीवर अवलंबून असेल. तर इरफानने, शेवटच्या तीन स्थानांमध्ये गोलंदाजांना जागा दिली आहे, त्याने अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती सारख्या गोलंदाजांना स्थान दिले आहे.
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती