फोटो सौजन्य - Social Media
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत क्षयरोग रुग्णालय समूह, शिवडी येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी निश्चित तारखेपूर्वी अर्ज दाखल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या या भरतीत एकूण ५ पदांची आवश्यकता आहे. यामध्ये कंत्राटी औषधनिर्माता आणि कंत्राटी समाज विकास अधिकारी या पदांचा समावेश आहे. ही पदे कराराच्या स्वरूपात असून उमेदवारांना महापालिकेच्या नियमांनुसार मानधन दिले जाणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती! अशा प्रकारे करा अर्ज; वेळ दवडू नका बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती! अशा प्रकारे करा अर्ज; वेळ दवडू नका
या भरतीसाठी उमेदवारांचे वय १७ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार प्रतिमाह ₹20,000 ते ₹25,000 इतके मानधन दिले जाणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन ठेवण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज पोस्टाने किंवा स्वतः जाऊन सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती जोडणे अनिवार्य आहे.
वैद्यकीय अधिक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह,जेरबाई वाडिया रोड, शिवडी, मुंबई – 400015
महत्वाची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज दाखल करावा.
बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक आहे. अशा संस्थेत नोकरीची संधी मिळणे ही एक प्रतिष्ठेची बाब मानली जाते. करारावर आधारित असली तरी औषधनिर्माता व समाज विकास अधिकारी या पदांमुळे उमेदवारांना आरोग्य क्षेत्रात अनुभव मिळणार असून भविष्यात करिअरच्या अनेक संधी खुल्या होतील. त्यामुळे इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा नक्की फायदा घ्यावा.