Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी…”; काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर?

भारत हा जगातील सर्वात तरुण देश असून २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे ध्येय आहे. या पार्श्वभूमीवर युवाशक्तीचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 27, 2026 | 02:35 AM
“व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी…”; काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर?
Follow Us
Follow Us:

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण
भारत हा जगातील सर्वात तरुण देश
२०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे ध्येय

मुंबई: व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शासनाबरोबरच (Maharashtra Government)  प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटकांनी जबाबदारी स्वीकारून एकत्रित प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सन २०२० ते २०२५ या पाच वर्षातील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर बोलत होते.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, समाजात परिवर्तन घडविण्याचे काम सामाजिक न्याय विभाग प्रभावीपणे करत असून, लोकोपयोगी उपक्रमांमुळे सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे. या सोहळ्यात १०० हून अधिक व्यक्ती आणि १३ संस्थांचा गौरव होत असून, हे कार्य राष्ट्रनिर्मितीला बळ देणारे आहे, असे त्यांनी नमूद केले. व्यसन ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या आहे. व्यसनामुळे आर्थिक नुकसान, उत्पादकतेत घट, आरोग्य व्यवस्थेवर ताण, गुन्हेगारीत वाढ, कुटुंबव्यवस्थेचे विघटन आणि शिक्षणातील गळती वाढते, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सापडले वादात; संजय राऊत यांनी व्हिडिओ केला ट्विट

भारत हा जगातील सर्वात तरुण देश असून २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे ध्येय आहे. या पार्श्वभूमीवर युवाशक्तीचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराप्रमाणे समाजात बदल घडवायचा असेल तर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध शांत न राहता सक्रिय भूमिका घेण्याची गरज आहे. समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पुढील काळात अधिक व्यापक उपक्रम राबविले जातील, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष अॅड नार्वेकर यावेळी व्यक्त केला.

Rahul Narvekar News: इच्छुकांना राहुल नार्वेकरांनी दिली धमकी? व्हायरल व्हिडिओवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्त व गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प आहे. व्यसनामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होतात आणि तरुण पिढीवर त्याचे गंभीर परिणाम होतात. ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी अडकू नये यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. “व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा आहे,” असा संदेश देत नागरिकांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

Web Title: Rahul narvekar said need for collective efforts to create an addiction free society

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Maharashtra Health Department
  • Mumbai News
  • Rahul Narvekar

संबंधित बातम्या

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
1

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ
2

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा
3

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
4

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.