Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Prabhat Lodha: “राष्ट्रहिताच्या विचारांनी ITI मध्ये…”; मंत्री मंगलप्रभात लोढांची संकल्पना

येत्या शैक्षणिक वर्षापासून आयटीआय मध्ये अत्याधुनिक सहा विषयांचे नवे अभ्यासक्रमही सुरु करणार असल्याची माहितीही लोढा यांनी यावेळी दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 04, 2025 | 08:45 PM
Mangal Prabhat Lodha: “राष्ट्रहिताच्या विचारांनी ITI मध्ये…”; मंत्री मंगलप्रभात लोढांची संकल्पना
Follow Us
Follow Us:

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निम्मिताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

येत्या सहा जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडीओ संदेशाद्वारे या व्याख्यानमालेचे उदघाटन होणार आहे. त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून आयटीआय मध्ये अत्याधुनिक सहा विषयांचे नवे अभ्यासक्रमही सुरु करणार असल्याची माहितीही लोढा यांनी यावेळी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनी केवळ राज्य स्थापन केले नाही, तर प्रभावी प्रशासन, सामाजिक समरसता, जनकल्याण आणि कायद्याचे राज्य निर्माण करून सुराज्य घडवले हे विचार महाराष्ट्राच्या मातीत रुजवले. आजही महाराजांच्या विचारांची समाजाला आणि राष्ट्राला अत्यंत गरज असल्याने कौशल्य विकास विभागाने शिवराज्याभिषेकाच्या मुहूर्तावर राज्यव्यापी १०९७ आयटीआय मध्ये व्याख्यानमालेचे आयोजन केले असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, नागरी कर्तव्ये आणि स्वदेशी विचार हे पंच परिवर्तन संकल्पनेचे मुख्य आधारभूत विषय असून या व्याख्यानमालेत हेच विषय अंतर्भूत करण्यात आले आहेत अशी माहितीही मंत्री लोढा यांनी यावेळी दिली. या व्याख्यानामुळे नागरिकांना आपल्या कर्तव्याची जाणीव होईल. कायद्याचे पालन केल्याने राष्ट्र समृद्ध होऊन प्रगती साधता येईल. बंधुभाव वाढीस लागल्याने समाजातील भेद दूर होतील. पर्यावरणाचे संवर्धन करून प्रदूषण विरहित स्वच्छ व सुंदर देश उभा राहील. कुटुंब प्रबोधनामुळे कुटुंब व्यवस्थेत शांती, सुसंवाद, सौहार्द निर्माण होईल,असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या उपक्रमात जनतेने ही सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक सतीश सूर्यवंशी, उपस्थित होते.

कौशल्य विकास विभागाने आणलेल्या नव्या खाजगी – सार्वजनिक अर्थात पीपीपी धोरणाला उद्योगक्षेत्राचा चांगला प्रतिसाद लाभत असून येत्या शैक्षणिक वर्षांपासून सहा नवे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. यात सौर ऊर्जा तंत्रज्ञ, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञ, ड्रोन तंत्रज्ञ, आर्टिफिशिअल इंटिलिजन्स आणि इंडस्ट्रियल रोबोटिक्स या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यभरातल्या आयटीआय मध्ये सुमारे १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे आधुनिक प्रशिक्षण मिळणार आहे. या नव्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराचे जागतिक दालन उघड होणार असल्याचा विश्वास यावेळी मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.

Web Title: Shivarajyabhishek day will be celebrated in iti with national interest in mind said by minister mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 08:45 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधात मोहीम; वांद्रे-खार-सांताक्रझसह अंधेरीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा
1

मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधात मोहीम; वांद्रे-खार-सांताक्रझसह अंधेरीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Mumbai Powai Lake Restoration: मुंबईची पाण्याची चिंता मिटणार? पवई तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेचा मोठा प्लॅन
2

Mumbai Powai Lake Restoration: मुंबईची पाण्याची चिंता मिटणार? पवई तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेचा मोठा प्लॅन

Mumbai News: गोवंडीचा RMC प्लाण्ट होणार बंद! सर्व पक्षांच्या १३ नगरसेवकांचा विरोध; प्रदूषणामुळे टीबी रुग्णांमध्ये वाढ
3

Mumbai News: गोवंडीचा RMC प्लाण्ट होणार बंद! सर्व पक्षांच्या १३ नगरसेवकांचा विरोध; प्रदूषणामुळे टीबी रुग्णांमध्ये वाढ

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released:  प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
4

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released: प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.