Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नको काँग्रेस, नको राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा ‘एकला चलो रे’चा नारा? BMC निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता

आम्हाला सोडून गेलेल्या गद्दारांची पर्वा नाही. आता आपल्याला संपूर्ण ताकदीनिशी नवीन उड्डाण भरायची आहे. ईव्हीएमचा प्रश्न आहे, आम्ही त्यात लक्ष घालू.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 04, 2024 | 09:01 AM
नको काँग्रेस, नको राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा 'एकला चलो रे'चा नारा

नको काँग्रेस, नको राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा 'एकला चलो रे'चा नारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजप-महायुतीला चांगले यश मिळाले आहे. बहुमताचा आकडाही पार केला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. असे असताना आता उद्धव ठाकरे आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने तयारीही केली जात असल्याची माहिती आहे.

हेदेखील वाचा The Sabarmati Report : “हिंमत असेल तर मणिपूर फाईल चित्रपट काढा…”; संजय राऊतांचे NDA ला थेट चॅलेंज

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील सर्व आजी-माजी नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक घेतली. यावेळी आजी-माजी नगरसेवकांसोबत चर्चा करताना ठाकरे म्हणाले, आम्हाला सोडून गेलेल्या गद्दारांची पर्वा नाही. आता आपल्याला संपूर्ण ताकदीनिशी नवीन उड्डाण भरायची आहे. ईव्हीएमचा प्रश्न आहे, आम्ही त्यात लक्ष घालू. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी तुम्ही कामाला लागा. निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. बेफिकीर राहू नका, लोकांमध्ये जा आणि नव्या ऊर्जेने काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीएमसी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे गटाकडून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील गटप्रमुखांचेही शिबिर आयोजित केले जाईल, अशी माहिती आहे.

227 प्रभागांत तयारीला सुरुवात

ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील 227 प्रभागात तयारीला सुरुवात केली असून, बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुंबईतील आमदारांसह नेते, सचिव आणि संघटकांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, सुनील राऊत, सुनील शिंदे, अमोल कीर्तिकर यांच्यासह एकूण 18 जणांची टीम प्रत्येकी दोन विधानसभेतील बारा प्रभागांचा आढावा घेणार आहे. पुढील आठवडाभरात हा अहवाल तयार करून  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवला जाणार आहे.

हिंदुत्व सोडल्याचा अपप्रचार

ठाकरे पुढे म्हणाले, बीएमसी निवडणुकीत आपल्याला हिंदुत्वाचा मुद्दा जनतेसमोर जोरकसपणे मांडायचा आहे. शिवसेना पूर्वीपासून हिंदुत्वासाठी लढत आहे, आजही लढत आहे आणि भविष्यातही लढत राहील. आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, असा अपप्रचार विरोधक करत आहेत. हिंदुत्वाच्या मुद्यावर विरोधकांना चोख प्रत्युत्तर द्या. तळागाळात काम करा. बीएमसीवर भगवा फडकवायचा आहे. आतापासूनच कामाला लागा, असे निर्देशही त्यांनी दिले.

हेदेखील वाचा : एकनाथ शिंदेची नाराजी दूर होणार? महायुतीतील तिढा सोडवण्यासाठी रामदास आठवलेंनी सूचवला उपाय

Web Title: Shivsena of uddhav thackeray may contest bmc election independently nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 09:01 AM

Topics:  

  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray : ‘गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ टायगर श्रॉफ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
1

Uddhav Thackeray : ‘गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ टायगर श्रॉफ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरेंनी सांगितली युवराजची गोष्ट आणि सगळेच हळहळले; राज्यातील भयाण दुष्काळाचे मांडले वास्तव!
2

Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरेंनी सांगितली युवराजची गोष्ट आणि सगळेच हळहळले; राज्यातील भयाण दुष्काळाचे मांडले वास्तव!

Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava 2026 Live : कितीही दरोडेखोर येउदेत, पण आपला भगवा.., ठाकरेंची तोफ धडाडली
3

Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava 2026 Live : कितीही दरोडेखोर येउदेत, पण आपला भगवा.., ठाकरेंची तोफ धडाडली

Dasara Melava 2026 : दसरा मेळाव्यात मोठा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात येणार राज ठाकरे? सेनेच्या बड्या नेत्याचा दावा
4

Dasara Melava 2026 : दसरा मेळाव्यात मोठा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात येणार राज ठाकरे? सेनेच्या बड्या नेत्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.