द साबरमती रिपोर्ट चित्रपट पाहिल्यामुळे संजय राऊतांनी साधला पीएम नरेंद्र मोदींवर निशाणा (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांची प्रकृती देखील खराब झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधी सोहळा येत्या 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल असे जाहीर केले आहे. मात्र आता यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, ज्या पद्धतीने राज्यात सरकार स्थापनेचा गोंधळ सुरू आहे. तो एक प्रकारे अराजकता आहे. एवढं बहुमत मिळाल त्यावर लोकांचा विश्वास नाही. अनेक गावात फेरमतदान आणि मतमोजणीची मागणी होत आहे. माळशिरस तालुक्यात मारकटवाडी गावात आज बॅलेटवर मतदान होत आहे. लोकांना ईव्हीएमवर संशय आहे. 10 दिवस झाले तरी हे बहुमताचे सरकार राज्यपालांकडे जात नाहीत. पण असं असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष शपथविधीची तारीख सांगतात. तिकडे मंडप घातला जातोय. आम्ही असतो तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असती, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
राज्यामध्ये महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु असल्यामुळे संजय राऊतांनी टीकास्त्र डागलं. ते म्हणाले की, विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या देशातला विरोधी पक्ष संपवण्याचा कट आहे. महाराष्ट्रात जे सुरु आहे, एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जे रुसवे-फुगवे सुरु आहेत, त्यामागे दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती कार्यक्रम करत आहे. त्याशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारचं धाडस करु शकत नाहीत. सध्या दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांसमोर असे रुसवे फुगवे करण्याची कोणाची हिम्मत आहे का? अडीच-तीन वर्षांपूर्वी जे लोक ईडी-सीबीआयला घाबरुन दिल्लीतल्या गृह मंत्रालयाला घाबरुन ज्यांनी शिवसेना फोडली आणि पळून गेले, त्यांना तीन वर्षात असं कोणतं टॉनिक मिळालं, ते दिल्लीला डोळे वटारुन दाखवतायत. हा भाजपचा अंतर्गत खेळ आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
Joined fellow NDA MPs at a screening of ‘The Sabarmati Report.’
I commend the makers of the film for their effort. pic.twitter.com/uKGLpGFDMA
— Narendra Modi (@narendramodi) December 2, 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या सर्व खासदारांसोबत द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट पाहिला. सर्व खासदारांसोबत त्यांनी चित्रपट पाहिलेले फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, उद्या संबल फाईल, मग महाराष्ट्र फाईल असा चित्रपट काढतील..आणि प्रेक्षक हेच बघायला पाठवतील. हिंमत असेल तर मणिपूर फाईल चित्रपट काढा. महाराष्ट्रात संविधानाची हत्या झाली त्यावर चित्रपट काढा. उद्या एकनाथ शिंदे देखील सिनेमा काढतील. ते फक्त NDA मधील लोकांना चित्रपट बघायला बोलतात. आम्हाला पण चित्रपट बघायला बोलवा. आम्ही पण समीक्षण करू. शरद पवार यांना देखील बोलवा, ते साहित्य संमेलनाचे स्वागाध्यक्ष आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.