Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Employees: वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्याला मंजुरी; एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईकांचे मानले आभार

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत वार्षिक वेतनवाढीतील १ टक्के फरक, वाढीव महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुलैच्या वेतनात (ऑगस्टमध्ये देय) ही वाढ लागू होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 29, 2026 | 12:02 PM
वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्याला मंजुरी; एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईकांचे मानले आभार

वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्याला मंजुरी; एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईकांचे मानले आभार

Follow Us
Follow Us:
  • वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्याला मंजुरी
  • एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईकांचे मानले आभार
  • आर्थिक मागण्या मान्य झाल्याने मंत्री प्रताप सरनाईकांचा सत्कार
मुंबई : एसटीमधील सर्व श्रमिक संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित आर्थिक मागण्यांबाबत हल्लीच आंदोलनाची नोटीस दिली होती. त्यावर एसटीचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे आंदोलन करण्याची गरज भासली नाही, वेतन सुधारणेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून त्याबद्दल आज मंत्री सरनाईक यांचा सत्कार महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात करण्यात आला. लाडू वाटप करून त्यांना कर्मचाऱ्यांच्या वतीने धन्यवाद देण्यात आले.

MSRTC News : लालपरीच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्यात वाढ जाहीर

एसटी कर्मचाऱ्यांना प्रलंबित वार्षिक वेतनवाढीचा एक टक्के फरक, वाढीव महागाई भत्ता, व वाढीव घरभाडे भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला व जुलैच्या वेतनात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात ही वाढ लागू करण्याचे मान्य केले .विशेष म्हणजे वेतन सुधारणेचा हा निर्णय विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहिर करण्यात आल्याने चर्चेत सहभागी सर्व सदस्यांचे आभार सुद्धा कर्मचाऱ्यांनी मानले आहेत.यातील वार्षिक वेतनवाढ फरकाचा निर्णय खूप महत्त्वाचा असून त्यातून कर्मचाऱ्याना चांगली वाढ मिळणार आहे. हा प्रश्न बरीच वर्षे प्रलंबित होता तो मान्य करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, मनीष मसुरकर, साक्षी कलमकर, राहुल माने, प्रदीप तायडे, औदुंबर कुंभारकर, सागर राजपुरे आदी उपस्थित होते.

एसटी महामंडळावर दरमहा सुमारे ४५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे आणि त्यांच्या न्याय्य हक्कांना मान्यता देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे ५,६४९ कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष करतानाही संयमाची भूमिका घेतलेल्या सर्व कर्मचारी संघटनांचे त्यांनी आभार मानले. तसेच कृती समितीचे नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत, माजी परिवहन मंत्री अनिल परब, आमदार भाई जगताप, आमदार प्रवीण दरेकर तसेच कृती समितीचे सर्व सदस्य यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना सातत्याने शासनापर्यंत पोहोचविल्याबद्दल त्यांच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. या निर्णयानंतर २९ जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून, हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनवाढ, महागाई भत्तासंदर्भात प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Web Title: St employees salary hike pratap sarnaik felicitation mumbai news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • maharashtra
  • st bus
  • ST Employees

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.