मुंबई : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसवर नामुष्कीची स्थिती ओढवली आहे. निर्णायक निवडणुकीत सतत येणाऱ्या अपयशामुळे काँग्रेस अस्तित्वहीन होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही पक्षाच्या पराभवावर खंत व्यक्त केली आहे(Sushilkumar Shinde’s reaction to the defeat of the Congress).
स्वतःची ताकद असलेल्या पंजाबसारख्या राज्यातही लाथाळ्यांमुळे काँग्रेसला सत्ता राखता आली नाही. शेतकरी आंदोलनावरून स्थानिक लोकांचा भाजपावर असलेला रोष या पक्षाला मतांमध्ये परावर्तीत करता आला नाही. एका अर्थाने सगळीकडेच नेतृत्व आणि संघटनेच्या पातळीवर काँग्रेस कमकुवत होत असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. देशात सक्षम विरोधी पक्षाची पोकळी दिवसेंदिवस विस्तारत असताना एका मोठ्या पक्षाचे चिन्ह होणे लोकशाहीच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
सुशिलकुमार शिंदे यांनी पंजाबमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे खापर नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्यावर फोडले आहे. पंजाबमध्ये या दोघांचे नेतृत्व कुचकामी ठरले आहे. पंजाबमध्ये 32 टक्के मागासवर्गीय जनता आहे. पंजाबमध्ये संघटन आणि प्रशासन या दोन्ही ठिकाणी पक्ष कुमकुवत झाल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. पंजाबमध्ये संघटन आणि प्रशासन या दोन्ही ठिकाणी पक्ष कुमकुवत झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. पंजाबात काँग्रेस होती पण तेथे निवडणुकीच्या सहा महिन्यातील घडामोडीनंतर नवे नेतृत्व आले.
नवीन कार्यकारणी घेऊन कामाला सुरुवात झाली. सिद्धू क्रिकेटच्या ग्राउंडवर जसे खेळायचे तसे त्यांनी राजकारणाच्या ग्राऊंडवर खेळायला सुरुवात केली. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. त्यांना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडू लागले, त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता नव्हती म्हणून काँग्रेसने मागासवर्गीयांचे नेते असलेल्या चन्नी यांना मुख्यमंत्रीपद दिले, असे शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या दोघांनी मनापासून लोकांमध्ये जाऊन काम करायला हवे होते, मात्र दोघांनीही आपले नेतृत्व कुचकामी असल्याचे सिद्ध केल्याचे शिंदे म्हणाले.
शिंदे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे कौतुक केले आहे. अनेक कठिण प्रसंगात त्यांनी सरकार आणि पक्ष टिकवून ठेवला आहे. परिस्थिती पलटवण्यात त्या यशस्वी होतील असा विश्वास यावेळी शिंदे यांनी या लेखात व्यक्त केला आहे. तसेच सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांच्याकडे क्षमता असल्याचे ते म्हणाले. जे काँग्रेस सोडून गेले आहेत, त्यांना परत आणण्याचे प्रयत्न करायला हवेत. तसेच सर्वधर्मसमभाव माननारी युवकांची फळी तयार करायला हवी असे ते म्हणाले.
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]