Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा लवकरच विस्तार होणार; आठवडाभरात निविदाही काढली जाणार

प्रस्तावास नुकतीच सरकारने मान्यता दिल्याने नव्याने या प्रकल्पांसाठी निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार, निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 16, 2026 | 09:26 AM
समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार

समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार

Follow Us
Follow Us:
  • नवीन वर्षात काम सुरू करणार
  • निविदेची प्रक्रिया पूर्ण
  • नवेगाव-सुरजागड द्रुतगती महामार्गही बांधण्याचा निर्णय
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यासाठी विदर्भात तीन रस्ते प्रकल्प हाती घेतले. तीन द्रुतगती महामार्गांचा यात समावेश आहे. तर खनिज वाहतुकीला वेग देण्यासाठी नवेगाव-सुरजागड द्रुतगती महामार्गही बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने या चारही प्रकल्पांच्या खर्चाला नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली. त्यानुसार, एमएसआरडीसीने निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, आठवड्याभरात सुमारे ४६ हजार कोटी रुपयांच्या या चारही प्रकल्पांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर या चारही प्रकल्पांची कामे नवीन वर्षात सुरू करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. एमएसआरडीसीने राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्यभरात अंदाजे चार हजार किमीचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील महत्त्वाचा असा ७०१ किमीचा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बांधून पूर्ण करून सेवेत दाखल केला आहे.

आता हा महामार्ग राज्यातील अधिकाधिक जिल्ह्यांशी थेट जोडला जावा यासाठी समृद्धीचा विस्तार केला जात आहे. यात नागपूर गोंदिया, नागपूर चंद्रपूर आणि भंडारा गडचिरोली या तीन द्रुतगती महामार्गांचा समावेश आहे.

निविदेची प्रक्रिया पूर्ण

तिन्ही महामार्गाच्या बांधकामासाठी काही वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, यावेळी एमएसआरडीसीच्या निश्चित दराच्या तुलनेत अधिक दराने निविदा सादर झाल्या होत्या. त्यामुळे या निविदा रद्द करण्याची नामुष्की एमएसआरडीसीवर ओढवली आणि प्रकल्पाची अंमलबजावणी लांबणीवर गेली. त्यानंतर पुन्हा सुधारित खर्चाचा प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. त्या प्रस्तावास नुकतीच सरकारने मान्यता दिल्याने नव्याने या प्रकल्पांसाठी निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार, निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तर आठवड्याभरात या तिन्ही प्रकल्पांसाठी निविदा काढण्यात येतील, असेही त्यानी सांगितले.

नवीन वर्षात कामाला सुरुवात

समृद्धी महामार्गाच्या तीन विस्तारीत प्रकल्पाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून नवीन वर्षात कामाला सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. विदर्भातील तीन प्रकल्पांच्या बांधकामासह आणखी एका प्रकल्पासाठी आठवडाभरात निविदा काढण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

FAQ

महामार्गाच्या बाजूला रेल्वे लाईन येणार का?
उत्तर: हो. समृद्धी महामार्गालगत मालवाहतूक रेल्वे लाईन टाकणार. नागपूरमध्ये बांधकाम करताना आधीच जागा राखीव ठेवली होती. नाशिक-जालना-वर्धा (Dry Port) – गडचिरोली पर्यंत फ्रेट कॉरिडोर.

नवीन सुविधा काय येणार आहेत?
उत्तर: 2 मोठ्या घोषणा 14 ऑक्टो 2026 ला -A) Air Ambulance Service: समृद्धी महामार्ग + मुंबई-पुणे एक्सप्रेसवे + मुंबई-गोवा हायवेवर 2027 च्या जानेवारीपासून हवाई रुग्णवाहिका. Golden Hour मध्ये अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी. SOP 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत, टेंडर नोव्हेंबर अखेर. 15,000 अपघात दरवर्षी महाराष्ट्रात.

16 इंटरचेंजवर नवीन शहरे: MSRDC आता 16 ठिकाणी नियोजन प्राधिकरण (Planning Authority) – 500 ते 2000 हेक्टरवर कृषी समृद्धी केंद्र / नवीन टाउनशिप – विरुळ, दत्तापूर, शिवनील, शेह, वानोझा, हदस, घायगाव, धोतरा, सावळी विहीर, फुगले, सापगाव, हिवरा/लेणद, चिंचवली इ.

Web Title: The samruddhi mahamarg will be expanded nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • maharashtra
  • Samruddhi Mahamarg
  • Traffic Issue

संबंधित बातम्या

Gondiya News: गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित! आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनीचा समावेश
1

Gondiya News: गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित! आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनीचा समावेश

‘छत्रपती’चा गळीत हंगाम सुरू, ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; सभासदांसह गेटकेन ऊसालाही समान दर देण्याची ग्वाही
2

‘छत्रपती’चा गळीत हंगाम सुरू, ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; सभासदांसह गेटकेन ऊसालाही समान दर देण्याची ग्वाही

Pratap Sarnaik: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! सरनाईक कुटुंबाकडून दोन लाख ‘आनंदाचा शिधा’ किट वाटपाचा उपक्रम
3

Pratap Sarnaik: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! सरनाईक कुटुंबाकडून दोन लाख ‘आनंदाचा शिधा’ किट वाटपाचा उपक्रम

शिवणे–नांदेड सिटीदरम्यान पूल उभारण्याचा मार्ग मोकळा, महापालिकेची तांत्रिक मान्यता; कामासाठी हालचालींना वेग
4

शिवणे–नांदेड सिटीदरम्यान पूल उभारण्याचा मार्ग मोकळा, महापालिकेची तांत्रिक मान्यता; कामासाठी हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.