Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहतूक कोंडीला दिलासा! मुंबई-ठाणे प्रवास होणार सोपा; वडाळा-कासारवडवली मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात

वडाळा ते कासारवडवली मेट्रो-४ प्रकल्पातील मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. विक्रोळीतील लक्ष्मीनगर स्थानकाच्या जमिनीचा वाद सुटल्याने रखडलेले काम आता वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 16, 2026 | 11:28 AM
वाहतूक कोंडीला दिलासा! मुंबई-ठाणे प्रवास होणार सोपा; वडाळा-कासारवडवली मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात

वाहतूक कोंडीला दिलासा! मुंबई-ठाणे प्रवास होणार सोपा; वडाळा-कासारवडवली मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात

Follow Us
Follow Us:
  • वडाळा-कासारवडवली मेट्रो प्रकल्पातील जमिनीचा वाद अखेर मिटला.
  • सुमारे ८४% काम पूर्ण झाले असून फक्त एका स्थानकाचे काम बाकी आहे.
  • २०२७ पर्यंत मेट्रो सुरू होऊन मुंबई-ठाणे प्रवास अधिक सुलभ होणार.
बहुप्रतीक्षेत असलेल्या वडाळा ते कासारवडवली या मेट्रो मार्गिकेच्या कामातील सर्वात मोठा अडथळा आत्ता दूर झाला आहे. विक्रोळी येथील लक्ष्मीनगर स्थानकाच्या जमिनीवरून सुरू असलेला खासगी कंपनीचा वाद संपुष्टात आल्याने या मार्गिकेच्या कामाला आता मोठी गती मिळणार आहे. यामुळे रखडलेल्या स्थानकाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्याने वडाळा- कासारवडवली मेट्रोचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. गेल्या ६ वर्षांपासून या मार्गिकेचे काम रखडले असून आता या मेट्रो मार्गावरील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. वडाळा ते कासारवडवली मेट्रो लाइन ४ च्या मार्गावर केवळ एका स्थानकाचे काम शिल्लक होते.

देवनार कत्तलखान्यातून मांस का खरेदी केले जात नाही? राणीबागेतील वाघांना दिले जाते निकृष्ट दर्जाचे मांस

२०२७ मध्ये मेट्रो-४ सुरू होणार

एमएमआरडीने जमीन संपादित केली असून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. वडाळा-कासारवडवली मेट्रो मार्गावर फक्त विक्रोळी येथील लक्ष्मीनगर मेट्रो स्थानक बांधले नव्हते. या मागविर एकूण ३० स्थानके असून इतर सर्व स्थानकांचं काम पूर्ण झाले होते. ही संपूर्ण मार्गिका ३२.३२ किमी लांब उन्नत मार्गिका आहे. गेल्या आठवड्यात १६,७६२ चौरस मीटर भूखंड या प्रकल्पासाठी घेतला गेला होता. त्यामुळे आता या शेवटच्या मेट्रो स्थानकाचे काम सुरू करून ते २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण मार्गिकेचे सध्या ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे स्थानक तयार होताच २०२७ मध्ये ही मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे.

काम करण्याचे नियोजन

  • सुमारे ३२ किमी लांबीची ही मेट्रो मार्गिका संपूर्णपणे उन्नत स्वरूपाची असून त्यावर एकूण ३० स्थानके असणार आहेत.
  • आतापर्यंत या प्रकल्पाचे जवळपास ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
  • लक्ष्मीनगर येथील जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने या स्थानकाचे काम थांबले होते, ज्याचा परिणाम संपूर्ण प्रकल्पाच्या वेळेवर होत होता.
  • मात्र, आता हा तांत्रिक आणि कायदेशीर तिढा सुटल्यामुळे उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
IIT Bombay येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा; आशिष शेलार

वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार

गार्डनर, कासारवडवली आणि कॅडबरी जंक्शन अशी स्थानक आहेत. या भागावरील चाचणी फेऱ्या पूर्ण झाल्या असून, ६ डब्याच्या ट्रेनचा यासाठी वापर करण्यात आला. ही संपूर्ण मार्गिका एकूण ३ टप्प्यात सुरू होणार आहे. पहिल्या १० किमी लांब टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंत १० स्थानकांचा समावेश आहे. पुढील दुसऱ्या टप्प्यात कॅडबरी जंक्शन ते गांधी नगर २१.५ किमी टण्याचा समावेश आहे. हा मार्ग ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, शेवटच्या टप्प्यात गांधीनगर ते वडाळा मार्ग तयार करण्यात येणार आहे. है काम ऑक्टोबर २०२७पर्यंत पूर्ण होईल. वडाळा ते कासारवडवली मेट्रोमुळे दक्षिण मुंबई आणि ठाण्यामध्ये थेट कनेक्टीव्हीटी निर्माण होणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादि केलेले नाही.)

Web Title: Wadala kasarvadavali metro line 4 update mumbai thane connectivity 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Metro
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
1

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
2

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप
3

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास
4

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.