Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Municipal Election Voting 2026 Live: बोगस मतदान कार्ड्सचा ढीग,EVM मध्ये बिघाड, अन् राडाच राडा ; मतदानातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरात मतदान यंत्रावरील बटणे काम करत नसल्याने उमेदवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक 9 मधील मतदान केंद्र क्रमांक 15 मध्ये हा सगळा प्रकार घडला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 15, 2026 | 02:59 PM
Municipal Election Voting, Maharashtra Municipal Election 2026

Municipal Election Voting, Maharashtra Municipal Election 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज 15 जानेवारी मतदान
  • पिंपरीत मतदान केंद्रावर राडा
  • बोगस मतदानाच्या आरोपावरून मतदान केंद्रावर गोंधळ
 

Municipal Election Voting 2026 Live: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज 15 जानेवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अशातच मालेगावातून एक धक्कदायक बाब समोर आली आहे. मालेगावात एकाच ठिकाणी ८०० हून अधिक मतदान कार्ड सापडल्याच प्रकार समोर आला आहे. हे मतदान कार्ड बोगसअसल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान कार्ड सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही बाब समोर आल्यानंतर पोलिस प्रशासनाने कारवाईस सुरूवात केली आहे. पोलिसांनी हे कार्ड जप्त करून त्याचा पंचनामा सुरू केला आहे. तर निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशीही सुरू केली आहे. (PMC Municipal Election 2026)

पिंपरीत मतदान केंद्रावर राडा,

पिंपरीत मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा आरोप करत एका महिलेने चांगलाच राडा घातला. इतकेच नव्हे तर तिने निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी देखील रोखून धरली. पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव नाहीत मतदार याद्या व्यवस्थित नाहीत, उमेदवाराला न विचारता EVM मशीन वरील स्टिकर निवडणूक विभागाने काढून टाकले, बदलले, असा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचे नातेवाईक विद्या जवळकर यांच्याकडून करण्यात आला आहे. या सर्व आक्षेपांबाबत जवळकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. पण त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे त्यांनी थेट मतदान केंद्रावरच राडा घालत निवडणूक आयोगाची गाडी रोखली.   (PCMC Municipal Election 2026)

BMC Election 2026 : “मतदानासाठी वापरण्यात आलेली शाई पुसली जाते…”, निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं…

 

जळगाव: बोगस मतदानाच्या आरोपावरून मतदान केंद्रावर गोंधळ

जळगाव शहरातील आर. आर. विद्यालय मतदान केंद्रावर आज बोगस मतदानाच्या संशयावरून मोठा गदारोळ झाला. प्रभाग क्रमांक पाचमध्ये अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. याचदरम्यान ॲड. पियुष पाटील यांनी सकाळपासूनच केंद्रावर संशयास्पद मतदार येत असल्याचा आरोप केला. त्यांच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ४० ते ४५ मतदारांकडे ओळखपत्रांची मागणी केली. मात्र, आवश्यक पुरावे सादर न करू शकल्याने या मतदारांना मतदान न करताच परत जावे लागले.

मतदान केंद्रावर वादाचे रूपांतर हाणामारीत; अकोल्यात पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात

अकोला महापालिकेतील प्रभाग १७ मध्ये भांडपुरा चौकातील महापालिकेच्या उर्दू कन्या शाळेत जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. अकोल्यात मतदान केंद्रावरच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झाले. सकाळपासून या मतदान केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.अचानक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली. पण पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

BMC Election 2026: मतदारांच्या बोटावरील शाईने राजकारण तापले! विरोधकांचे आरोप तर सत्ताधाऱ्यांकडून

EVM मशीन बिघाडाचा आरोप; संभाजीनगरमध्ये मतदारांच्या लांबच लांब रांगा,

संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरात मतदान यंत्रावरील बटणे काम करत नसल्याने उमेदवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक 9 मधील मतदान केंद्र क्रमांक 15 मध्ये हा सगळा प्रकार घडला. आधीच मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यातच हा घोळ झाल्याने आम्ही अजून किती वेळ रांगेत उभे राहायचे असा सवाल मतदारांकडून उपस्थित करण्यात आला.

 

Municipal Election Voting 2026 Live Pune Mumbai Nashik

 

 

Web Title: Municipal election voting 2026 live a pile of fake voter id cards in malegaon evm malfunction and chaos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • PMC Election 2026

संबंधित बातम्या

PMC Election 2026 : पुण्यात मतदानादरम्यान ईव्हीएम बदलण्याचे सत्र; 20 कंट्रोल युनिट अन्…
1

PMC Election 2026 : पुण्यात मतदानादरम्यान ईव्हीएम बदलण्याचे सत्र; 20 कंट्रोल युनिट अन्…

PMC Election 2026 : पुण्यात शिवसेनेचा मतदान केंद्राबाहेर गदारोळ; बोगस मतदार असल्याचे म्हणत राडा, पोलिसांची मध्यस्थी
2

PMC Election 2026 : पुण्यात शिवसेनेचा मतदान केंद्राबाहेर गदारोळ; बोगस मतदार असल्याचे म्हणत राडा, पोलिसांची मध्यस्थी

PMC Municipal Election 2026: लाडकी बहीण योजनेमुळे वारं फिरणार? पुणे महापालिका निवडणूक नव्या वळणावर
3

PMC Municipal Election 2026: लाडकी बहीण योजनेमुळे वारं फिरणार? पुणे महापालिका निवडणूक नव्या वळणावर

मतदार यादीत घोळ, भाजपने मताला 5 हजार रुपये वाटले; रोहित पवारांचे गंभीर आरोप
4

मतदार यादीत घोळ, भाजपने मताला 5 हजार रुपये वाटले; रोहित पवारांचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.