Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालिका कंडोमिनियमसाठी खर्च करणार ४३० कोटी, जल वाहिन्या होणार दुरुस्त; शासनाच्या अध्यादेशात झाली दुरुस्ती

कंडोमिनियमअंतर्गत मलनि:सारण होणार असून जलवाहिन्या लवकरच दुरुस्त करण्यात येणार आहे, शासनाच्या अध्यादेशात दुरुस्ती करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीला हे यश मिळाले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 26, 2025 | 11:02 AM
नवी मुंबई महानगरपालिका आता कंडोमिनियमसाठी करणार ४३० कोटीचा खर्च

नवी मुंबई महानगरपालिका आता कंडोमिनियमसाठी करणार ४३० कोटीचा खर्च

Follow Us
Close
Follow Us:
  • खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीला यश
  • कंडोमिनियमअंतर्गत मलनि:सारण
  • नवी मुंबई महानगरपालिका विकास 
नवी मुंबई/सिद्धेश प्रधानः सिडकोने बांधलेल्या कंडोमिनियम अंतर्गत सदनिकांना मलनि:सारण वाहिन्या दुरुस्ती पाणीपुरवठा वाहिन्या दुरुस्ती आणि विविध नागरी सुविधा नवी मुंबई महापालिकेने देण्यासाठी नगर विकास विभागाने २३ सप्टेंबर २०२५ च्या शासन अध्यादेश काढला होता. त्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३०.०२ चौ.मी वरील व ५५.०० चौ. मी. क्षेत्रफळापर्यंतची बैठी घरे व इमारतींसाठी रु.१७२.९६ कोटी तसेच, ५५.०० चौ. मी. क्षेत्रफळापर्यंतची बैठी व इमारतीमधील सर्व घरे मलनि:स्सारणाची व पाणी पुरवठ्याची कामे २५७.५५ कोटी म्हणजेच ४३० कोटी इतका खर्च प्रथमतः नवी मुंबई महानगपालिकेने स्वनिधीतून खर्च करायचे आहेत. 

सदरचा खर्च सदनिका धारकांकडून घरांचे पुनर्विकास करतेवेळी महानगरपालिकेस वसुल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सुधारित आदेश काढण्याची  मागणी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, किशोर पाटकर, सुरेश सकपाळ, रतन मांडवे, शीतल कचरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव आसिम कुमार गुप्ता यांच्याकडे केली होती. 

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

गेल्या १५ वर्षापासून रखडले होते काम 

सिडकोने नवी मुंबई शहर वसविताना विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रफळाच्या सदनिका बांधल्या आहेत. ज्यामध्ये कंडोमिनियम आणि सिडको वसाहतीमध्ये विभागणी केलेली आहे.  त्या ठिकाणी पायाभूत सुविधा उदा. मलनिसारण, पाणीपुरवठा इत्यादी सेवा सिडकोने किंवा महापालिकेने देणे गरजेचे होते. परंतु गेल्या पंधरा वर्षापासून सदर कंडोमिनियम व वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा सेवा पुरविण्या पुरविल्या जात नाहीत. त्याबाबत वारंवार नागरिकांच्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने ७ मे २०२५ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली होती. 

सदर बैठकीमध्ये सिडको कंडोमिनियम व वसाहतींना महापालिकेमधून पायाभूत सेवा पुरविण्याचे निर्देश दिले गेले होते. त्या अन्वये २३ सप्टेंबर २०२५ रोजी शासन निर्णय जाहीर झाला होता. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील एकूण सात नोडमध्ये ३०.०२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या बैठ्या स्वरूपाच्या कंडोमिनियम अंतर्गत घरांकरिता मलनिःसारण, पाणीपुरवठा इत्यादी सेवा महापालिका निधीतून करण्यास मंजुरी दिली होती. ३०. २ चौ. मी. व त्यावरील क्षेतफळाच्या  माथाडी, अत्यल्प, मध्यम उत्पन्न गटातील वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा देण्याचा उल्लेख केला गेला नव्हता. मात्र आता याची नोंद अध्यादेशात करण्यात आल्याने कंडोमियम अंतर्गत कामे सुरू होणार आहेत. 

काय केली आहे सुधारणा

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३०.०२ चौ.मी वरील व ५५.०० चौ. मी. क्षेत्रफळापर्यंतची बैठी घरे आणि इमारतींसाठी रु.१७२.९६ कोटी  रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच, ५५.०० चौ. मी. क्षेत्रफळापर्यंतचो बैठी व इमारतीमधील सर्व घरे मलनि:स्सारणाची व पाणी पुरवठ्याची कामे करण्याकरिता लागणारा रु.२५७.५५ कोटी इतका खर्च केले जाणार आहेत. हे पैसे प्रथमतः नवी मुंबई महानगपालिकेने स्वनिधीतून द्यायचे आहेत. त्यानंतर सदरचा खर्च सदनिकाधारकांकडून घरांचे पुनर्विकास करतेवेळी महानगरपालिकेस वसुल करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. मात्र यामुळे नागरिकांना सुविधा मिळणार आहेत 

नवी मुंबईत भंगार माफियांकडून दादागिरी, वाहतूक पोलिसांचे मात्र मौन, नागरिकांचा आरोप

शिंदे गट शिवसेनेचे मोठे यश

गेले अनेक वर्ष हा निर्णय खोळंबला होता. मात्र नवी मुंबई पालिका क्षेत्रातील नागरिक असूनही नागरिकांना पीक सुविधा पुरवू शकत नव्हती. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या दरबारात अडकलेला प्रश्न सोडविल्यामुळे ही शिंदे सेनेचे मोठे यश मानले जात आहे. आगामी काळा निवडणुकांमध्ये या विषयावर शिंदे गटाला याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Municipality will spend rs 430 crore for condominium water pipes will be repaired government ordinance amended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 11:02 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Naresh Mhaske
  • Navi Mumbai News

संबंधित बातम्या

Maharashtra News: महाराष्ट्राची प्रतिमा धुळीला; महिला अत्याचार, भ्रष्टाचारानंतर कर्जबाजारीपणातही राज्य अव्वल
1

Maharashtra News: महाराष्ट्राची प्रतिमा धुळीला; महिला अत्याचार, भ्रष्टाचारानंतर कर्जबाजारीपणातही राज्य अव्वल

Navi Mumbai News: खासगी रुग्णालयांनी लुबाडणूक केल्यास तातडीने कळवा, सर्व रुग्णालयांबाहेर राष्ट्रवादीने झळकावले फलक
2

Navi Mumbai News: खासगी रुग्णालयांनी लुबाडणूक केल्यास तातडीने कळवा, सर्व रुग्णालयांबाहेर राष्ट्रवादीने झळकावले फलक

प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा, आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
3

प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा, आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

जनतेच्या हातात कटोरा आहे का? तिजोरीच्या चाव्यांवर महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली, शिरसाटांनी सुनावलं
4

जनतेच्या हातात कटोरा आहे का? तिजोरीच्या चाव्यांवर महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली, शिरसाटांनी सुनावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.