
Sangali Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Live Updates
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत आणि आटपाडी अशा दोन ठिकाणी गड राखला, आटपाडीमध्ये त्यांचे कार्यकर्ते असणारे यु.टी.जाधव यांनी प्राथमिक शिक्षक पदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढली व प्रथम नगराध्यक्ष ठरले, या ठिकाणी माजी आमदार देशमुख व पडळकर यांची आघाडी प्रभावी ठरली तर जत मध्ये भाजप म्हणून त्यांनी भाजपचे जुने कार्यकर्ते डॉ.रविंद्र आरळी विजय झाले, दोन्ही ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी जोरदार ताकत लावून या निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लावला.
Maharashtra Local Body Election Result 2025 Live: राज्यातील 288 नगरपरिषद,
सांगली जिल्ह्यात सर्वाधिक चर्च ठरलेले उरण ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घवघवीत यश मिळाले आहे या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी आरोप प्रत्यारोप मुख्यमंत्र्यांसह मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या मात्र तरी देखील जयंत पाटील यांना आपला गड राखण्यात यश आले यामध्ये तुतारी चिन्हावर राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे नगराध्यक्ष पदावर निवडून गेले तर तू तरी चिन्हावर २२ उमेदवारांनी विजय मिळवला, राष्ट्रवादी (घड्याळ) ३, शिवसेना (शिंदे गट) २ आणि तरभाजपला ३ जागांवर समाधान मानावे लागले. ईश्वर पुरात जयंत पाटील यांनी पुन्हा विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला असल्याचे बोलले गेले.
तासगाव नगरपालिकेत आमदार रोहित पाटील यांना धक्का बसला, या ठिकाणी त्यांना त्यांच्या पक्षातील बंडखोरीचा फटका बसला, तासगावात नगराध्यक्ष पदावर स्वाभिमानी विकास आघाडी अर्थात माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाच्या विजया बाबासाहेब पाटील ९९ मतांनी विजयी झाल्या,
या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष अजय पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील यांनी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी स्वीकारल्याने संपूर्ण निवडणुकीला वेगळे वळण मिळाले. याचा धक्का आमदार रोहित पाटील यांना बसला.
विटा नगरपालिकेत सत्तांतर झाले, यावेळी पन्नास वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला, शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी विजय खेचून आणला, यावेळी इतिहासात पाहिक्यांदा पूर्ण सत्ता मिळवण्यात त्यांना यश आले, शिवसेना २२ तर भाजप ४ असा निकाल लागला, माजी आमदार सदाशिव पाटील यांना हा धक्का बसला आहे, सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या काजल म्हेत्रे ३२०० मतांनी विजयी मिळवला.
पलूस नगर परिषदेमध्ये आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी आपली सत्ता काबीज केली, यावेळी भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातून आलेले शरद लाड व भाजपचे आधीचा गट असणारे पृथ्वीराज देशमुख व संग्राम देशमुख अशी एकत्र ताकत असताना देखील भाजपला पराभवाचा सामना करावा लागला, अवघ्या एकाच जागेवर भाजपला समाधान मानावे लागले, या ठिकाणी काँग्रेसला १५ राष्ट्रवादीला ४ अशा जागा निवडून आल्या, नगराध्यक्ष पदी काँग्रेसच्या संजीवनी पुदाले विजयी झाल्या. त्यामुळं पलूस मध्ये विश्वजीत कदम यांची जीत झाली.
शिराळा नगरपंचायतीवर भाजप शिवसेनेची सत्ता अली असून हा राष्ट्रवादीचे मोठा धक्का मानला जात आहे. शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक हे विजय झाला आहे. तर राष्ट्रवादीचे अभिजित विजयसिंह नाईक यांचा पराभव झाला आहे. नगरपंचायतीच्या १७ जागेसाठी निवडणूक झाली असून नगरसेवक पदी भाजप शिवसेनेचे ११ नगरसेवक तर राष्ट्रवादीचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत.
आष्टा येथे आमदार जयंत पाटील यांचा करिष्मा कामी आला, जयंत पाटील व वैभव शिंदे यांनी आष्टा शहर विकास आघाडी म्हणून निवडणूक लढली, ज्यामध्ये २४ पैकी २३ जागा जिंकल्या तर नगराध्यक्षपदावर माजी आमदार विलासराव शिंदे यांचे चिरंजीव विशाल शिंदे हे विजय ठरले राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर एक उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकला.
आटपाडी : भाजप
जत : भाजप
शिराळा : शिवसेना
विटा : शिवसेना
ईश्वरपूर : राष्ट्रवादी शरद पवार
आष्टा : शहर विकास आघाडी
पलूस : काँग्रेस
तासगाव : स्वाभिमानी आघाडी