राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर: गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये भाजप आणि महायुतीचा प्रचंड मोठा विजय झाला. दरम्यान या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र त्यांच्या आमदारकिला आणि विजयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्या प्रकरणात फडणवीस यांना दिलासा मिळाला आहे.
कॉँग्रेस नेता प्रफुल्ल गुडधे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांकया विजयाला हायकोर्टात आव्हान दिले होते. दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने देवेंद्र फडणवीस यांना दिलासा दिला आहे. कोर्टाने कॉँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांची याचिका फेटाळून लावली आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुडधे यांच्यात मुख्य लढत झाली हटी. दरम्यान या लढतीत प्रफुल्ल गुडधे यांचा पराभव झाला होता. प्रफुल्ल गुडधे 39 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत झाले आहेत.
Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
या निवडणुकीत नियमांचे पालन केले गेले नसल्याचे म्हणत प्रफुल्ल गुडधे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे.
पोलिसांबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय
राज्य शासनाच्या 150 दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातील सर्व प्रकरणे मिशन मोडवर निकाली काढली जातील. त्याचबरोबर अनुकंपा भरतीसंदर्भात सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
Devendra Fadnavis: “… हा निर्णय मिशन मोडवर निकाली काढणार”; पोलिसांबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय
विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या कामकाजातील सुधारणा, गृहनिर्माण, आरोग्य, मानसिक आरोग्य व इतर सुविधांच्या संदर्भात प्रश्न विचारला होता. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, संजय खोडके, भाई जगताप, बंटी पाटील या सदस्यांनीही सहभाग घेतला.
पोलिसांच्या ड्युटीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सर्वप्रथम मुंबईतच 8 तासांची ड्युटी ही संकल्पना लागू करण्यात आली. काही वेळा सण-उत्सव किंवा बंदोबस्ताच्या वेळी यात अपवाद असतात, तरीही एकूणच पोलिसांची 8 तासाची ड्यूटी आता स्थिर झाली आहे. तसेच पोलिसांना साप्ताहिक सुट्टी देण्याची सुरुवात राज्यभर झाली असून, काही कारणास्तव सुटी न मिळाल्यास त्याचे ‘एनकॅशमेंट’ही मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आले आहे. आधी ही एनकॅशमेंटची रक्कम कमी होती, ती आता वाढवली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईसह राज्यभरात पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प राबवले जात आहेत. तालुका स्तरावरही काम वेगाने सुरू आहे. पोलिस गृह निर्माण महामंडळाचे काम अभूतपूर्व असल्याचे त्यांनी नमूद केले.