• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Balasaheb Thorat Has Become Aggressive Due To Threats From A Kirtan Singer

संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव, गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरातांचे आवाहन

किर्तनकाराच्या धमकीवरुन बाळासाहेब थोरात संतापले आहेत. अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा, असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 21, 2025 | 05:54 PM
संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव, गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरातांचे आवाहन

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संगमनेर : कीर्तनकर संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना थेट धमकी दिली आहे. आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल, असं भंडारे यांनी म्हटलंय. संगनेर तालुक्यातील घुलेवाडी या गावात संग्राम भंडारे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कीर्तनामध्ये भंडारी यांनी बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा थोरात समर्थकांचा दावा आहे. यावरुन आता संगमनेरमध्ये थोरात समर्थक आक्रमक झाले आहेत. संग्राम भंडारे यांचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील 25000 नागरिकांनी एकत्र भव्य शांती मोर्चा काढला. यावरुन आता बाळासाहेब थोरात संतापले आहेत. अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा, असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केले आहे.

स्वाभिमानी संगमनेर तालुका, सकल हिंदू समाज व विविध पुरोगामी संघटना आणि महाविकास आघाडी आणि विविध आध्यात्मिक व वारकरी संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ भव्य सद्भावना शांती मोर्चा संपन्न झाला. यामध्ये तालुक्यातील 25000 नागरिकांनी सहभाग घेऊन यशोधन कार्यालय ते नवीन नगर रोड असा शांती मोर्चा केला.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, थोर स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मी मुलगा आहे. संघर्ष आपल्याला नवीन नाही. विचारांसाठी आणि तत्त्वासाठी बलिदान देण्याची आपली तयारी आहे. हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाचे आम्ही पाईक आहोत. गगनगिरी महाराजांच्या सप्ताह मध्ये वाढण्यापासूनचे काम आपण केले आहे. गावोगावी मंदिरांचे बांधकाम व सुशोभीकरण आपण केले. सप्ताहांचे आयोजित केले. राष्ट्रपुरुष आणि संतांनी सांगितलेला मानवतेचा विचार घेऊन आपण पुढे चाललो. कधीही धर्माचा देखावा केला नाही. चुकीचा वागला त्याला शिक्षा झाली पाहिजे हा आग्रह आम्ही धरला.

नवीन लोकप्रतिनिधीने निवडणुकीच्या अगोदर कधी भगवी टोपी घातली होती का. भगवी टोपी घातली म्हणजेच हिंदू हे चुकीचे आहे. चाळीस वर्षांमध्ये हा तालुका आपण उभा केला. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा निर्माण केली. सातत्याने विकास कामे करून तालुका राज्यात अग्रक्रमणाने पुढे नेला. हा विकास काहींना पाहवत नाही आणि म्हणून या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हत्यार म्हणून आपला तालुका मोडण्याचा षड्यंत्र आखले जात आहे. मागील आठ महिन्यांमध्ये तालुक्यामध्ये गुंडगिरी आणि दहशत वाढली आहे.

नवीन लोकप्रतिनिधी डीएनए शब्द वापरला त्याचा अर्थ तरी त्याला माहित आहे का. एक प्रकारची शिवी आहे. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण तालुक्यात कधीही झाले नाही. तो तथाकथित महाराज नारदाच्या गादीचा अपमान करतो आहे. पाकीट घेऊन कीर्तन करतो आहे. त्याला राजकारण करायचे तर त्याने राजकीय स्टेजवर भाषण करावे. तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा डाव आखला जात असून, गावोगावी गुंड दहशत माजवत आहेत. आपल्याला आपल्या तालुक्याची संस्कृती जपायची असून, तालुक्याच्या विकासाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी गुंडांना वेळीच रोखा, असे आवाहन थोरात यांनी केले.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, तालुक्यामध्ये तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. दहशत निर्माण केली जात आहे. हे आम्ही चालू देणार नाही. नथुराम गोडसे हा आपला आदर्श नाही. दिखाऊ हिंदुत्व आपले नाही. कारण आपण खरे हिंदू आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि तो विचार घेऊन आपण पुढे जात आहोत. यावेळी विविध संघटनांनी आपला पाठिंबा व्यक्त केला.

बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला खडसावले

शांती मोर्चासाठी संगमनेर तालुक्यातील गावागावातून अनेक कार्यकर्ते गाड्या भरून संगमनेर शहरांमध्ये येत होते. मात्र या मोर्चामध्ये लोक येऊ नये याकरता पोलिसांनी चारही दिशांनी गाड्या अडवल्या ही बातमी कळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच खडसावले. तुम्ही कोणाच्या घरचे घरगडी आहात का असा सवाल करताना हा अन्याय संगमनेर तालुका सहन करणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला.

थोरात समर्थकांकडून भंडारेंचा तीव्र निषेध

घुलेवाडी येथील घटनाही नियोजित षडयंत्र होते. यासाठी मागील दहा दिवसांपूर्वीच प्लॅनिंग सुरू असल्याचे विविध व्हिडिओ व पुरावे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तमाम जनतेला दाखवले असून, प्रत्येक आरोपाचे खंडन करत हे षडयंत्र कसे रचले गेले संग्राम भंडारे कसा खोटा बोलत आहे. त्याच्यावर कोणताही हल्ला झाला नाही. भंडारे आणि नवीन लोकप्रतिनिधी यांचे हे षडयंत्र दाखवताना लाव रे तो व्हिडिओ म्हणत त्यांनी सर्व पुरावे सादर केले यावेळी तमाम जनतेने भंडारे याचा तीव्र निषेध केला

Web Title: Balasaheb thorat has become aggressive due to threats from a kirtan singer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 05:54 PM

Topics:  

  • ahmednagar
  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Sangamner

संबंधित बातम्या

काँग्रेसने ‘शाह’ यांना दिला ‘शह’! तालुका प्रभारी अध्यक्षपदी प्रकाश साळवी तर शहर प्रभारी अध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती
1

काँग्रेसने ‘शाह’ यांना दिला ‘शह’! तालुका प्रभारी अध्यक्षपदी प्रकाश साळवी तर शहर प्रभारी अध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती

पुरंदर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास
2

पुरंदर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास

Purandar Airport : पुरंदर विमानतळप्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ महिन्यापासून शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार
3

Purandar Airport : पुरंदर विमानतळप्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ महिन्यापासून शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार

महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत 15 दिवसांनी वाढवा; काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र
4

महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत 15 दिवसांनी वाढवा; काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा

Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा

Nov 26, 2025 | 02:35 AM
पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते

पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते

Nov 26, 2025 | 01:15 AM
लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळविले; फुरसूंगी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळविले; फुरसूंगी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

Nov 26, 2025 | 12:30 AM
भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं

भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं

Nov 25, 2025 | 11:23 PM
Pak-Afghan War: अफगाणिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा इशारा देताच पाकिस्तान घाबरला; ‘हवाई हल्ल्याचे आरोप खोटे’ म्हणत हात झटकले

Pak-Afghan War: अफगाणिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा इशारा देताच पाकिस्तान घाबरला; ‘हवाई हल्ल्याचे आरोप खोटे’ म्हणत हात झटकले

Nov 25, 2025 | 10:30 PM
Smriti Mandhana Wedding: स्मृती नाही, तर पलाशने ढकलली लग्नाची तारीख पुढे; सिंगरच्या आईचा मोठा खुलासा, काय घडले नेमके?

Smriti Mandhana Wedding: स्मृती नाही, तर पलाशने ढकलली लग्नाची तारीख पुढे; सिंगरच्या आईचा मोठा खुलासा, काय घडले नेमके?

Nov 25, 2025 | 09:55 PM
ICC T20 World Cup 2026 :  टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला खुणावत आहेत, दोन मिथकं!  जर ती तोडली तर…

ICC T20 World Cup 2026 :  टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला खुणावत आहेत, दोन मिथकं!  जर ती तोडली तर…

Nov 25, 2025 | 09:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM
CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

Nov 25, 2025 | 01:12 PM
NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

Nov 25, 2025 | 01:07 PM
Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Nov 24, 2025 | 11:31 PM
Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Nov 24, 2025 | 11:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.