Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टोल वाचवण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; चालकाचा विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू

चौदामैल येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी राखड घेऊन आला होता. मात्र, टोलनाका वाचवण्यासाठी परतीच्या वेळी मंगरुळ-गोंडखैरी पांदण रस्त्याने जात होते. तेव्हा ही दुर्घटना घडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 27, 2025 | 04:10 PM
रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : चालकाच्या चुकीमुळे अनेक अपघात होताना दिसत आहे. त्यात नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गोंडखैरी-मंगरुळ पांदण रस्त्यावर मंगळवारी (दि. २६) दुपारी सव्वा एकच्या सुमारास भीषण घटना घडली. टोलनाका वाचवण्यासाठी कंटेनर ट्रक पांदण रस्त्याने जात असताना 11 हजार व्होल्टच्या विद्युत तारेच्या स्पर्शाने चालकाचा जागीच मृत्यू झाला.

राजेशकुमार रामसुदर्शन यादव (वय ३१, रा. पिडारीया, पोस्ट बिझवली, ता. हनुमाना, जि. रिवा, मध्य प्रदेश) असे मृतक ट्रकचालकाचे नाव आहे. तो सिंगल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या (एनएल-०१/एन-८१९३) कंटेनर ट्रकवर कार्यरत होता. चालक चौदामैल येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी राखड घेऊन आला होता. मात्र, टोलनाका वाचवण्यासाठी परतीच्या वेळी मंगरुळ-गोंडखैरी पांदण रस्त्याने जात असताना गोंडखैरी शिवारातील अग्रवाल यांच्या शेताजवळ ट्रकचा वरील भाग विद्युत तारेस स्पर्श झाला आणि ही दुर्घटना घडली. त्यात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच काही कार्यकर्ते घटनास्थळी धावले आणि विद्युत विभागाला कळवून वीजपुरवठा बंद करण्यात आला. कळमेश्वर पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

मृतकाच्या मोबाईलवरील संपर्क क्रमांकावरून ट्रान्सपोर्ट मालकाला कळविण्यात आले. त्यानंतर तो घटनास्थळी दाखल झाला आणि मृतकाची ओळख पटली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मन्नान नौरंगाबादे व पोलिस शिपाई राणा सिंह करीत आहेत.

राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस

दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळे अनेक दुर्घटना होत असल्याचे समोर येत आहे. असे असताना आता बुलडाण्यात मायलेकीला विजेचा जोरदार धक्का बसला. घराच्या अगदी चार फूट अंतरावरून गेलेल्या अतिउच्च दाबाच्या विजतारांचा स्पर्श झाल्याने मायलेकी गंभीर जखमी झाल्या.

Web Title: Driver dies of severe electric shock incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 04:10 PM

Topics:  

  • Nagpur News
  • toll news

संबंधित बातम्या

Nagpur News  : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 
1

Nagpur News : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.